Join us  

ना अजय देवगन ना लेक युगचा, काजोलच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर 'हा' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 9:19 AM

काजोलच्या मोबाईलच्या वॉल पेपपरवर कुणाचा फोटो आहे.

काळेभोर डोळे, सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल.  बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या काजोलचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिच्या सौंदर्याने तिने सर्वांच्याच हृदयात स्थान मिळवलं आहे. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नेहमीच चर्चेत असते. करिअरबरोबरच काजोल आपल्या कुटुंबालाही तेवढाच वेळ देते. तिचं कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. तुम्हाला माहीत आहे का, काजोलच्या मोबाईलच्या वॉल पेपपरवर कुणाचा फोटो आहे.

काजोलचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोलच्या मोबाइलवरचा वॉलपेपर पाहायला मिळत आहे. काजोलनं आपल्या फोनच्या वॉलपेपरवर पती अजय देवगण आणि लेक युगचा फोटो ठेवलेला नाही. तर तिच्या फेवरेट व्यक्तीचा फोटो तिनं वॉलपेपर ठेवला आहे. तिची फेवरेट व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नाही तर लाडकी लेक न्यासा आहे. न्यासा देवगणचा फोटो  काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर पाहायला मिळतोय. 

काजोल आणि तिची लाडाची लेक न्यासा यांच्यात खास बॉन्डिंग आहे. न्यासादेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जातं आहे. काजोलने १९९९ साली बॉलिवूड अभिनेता अजय देवगणशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना न्यासा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे.   काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गेल्यावर्षी काजोलने ओटीटी क्षेत्रात पदार्पण केलं. 'लस्ट स्टोरीज २' या चित्रपटाच्या माध्यमातून काजोलने ओटीटी माध्यमांत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये ती पाहायला मिळाली. 

टॅग्स :काजोलअजय देवगणसेलिब्रिटीबॉलिवूड