Join us
Daily Top 2Weekly Top 5

"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:26 IST

'मेट्रो इन दिनो' सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी महिलांच्या रोमान्सबद्दल आणि भारतीय महिलांबद्दल वक्तव्य केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या परखडपणे त्यांचं मत मांडताना दिसतात. सध्या नीना गुप्ता या 'मेट्रो इन दिनो' या त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये त्या सध्या व्यग्र आहेत. 'मेट्रो इन दिनो' सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी महिलांच्या रोमान्सबद्दल आणि भारतीय महिलांबद्दल वक्तव्य केलं आहे.  नीना गुप्ता यांनी 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "६०, ७० किंवा ८० वर्षांच्या माणसाला रोमान्स करण्याची इच्छा होत नाही, असं नाही. आपल्याकडे महिला खासकरुन भारतातील महिला असा विचार करतात की आता झालं. चाळीशीनंतरच त्या असा विचार करू लागतात. आता मध्यम वर्षांच्या महिला जीममध्ये जातात. कारण, त्यांना फिट राहायचं आहे. पण, त्यासाठी इच्छा असणं महत्त्वाचं आहे. इच्छा असल्यामुळेच त्या हे सगळं करतात. जोपर्यंत आपण श्वास घेतो तोपर्यंत आपण स्वप्न बघत असतो". 

"मी अजूनही रोमँटिक होते. रोमान्स म्हणजे फक्त सेक्स किंवा आकर्षण नाही तर रोमान्स म्हणजे चांगली भावना अनुभवणं. मी माझ्या कपड्यांसोबत रोमान्स करते. जेव्हा मी छान तयार होते तेव्हा मला खूप छान वाटतं. मी ज्या घरातून येते तिथे बिकिनी वगैरे घालणं चालत नाही. पण, जेव्हा मी मुंबईत आले आणि एकटी राहायला लागले. मी बाथरुममध्ये बिकिनी घालून स्वत:ला आरशात पाहिल्यानंतर मला छान वाटलं", असंही त्या पुढे म्हणाल्या. 

दरम्यान, मेट्रो इन दिनो सिनेमा येत्या ४ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात नीना गुप्ता, सारा खान, आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, अली फझल हे कलाकार आहेत. अनुराग बासूने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :नीना गुप्तासेलिब्रिटी