Join us

'कौशिकन, आम्ही एकमेकांना...', सतीश कौशिक यांच्या आठवणीत नीना गुप्ता भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 16:26 IST

सतीश कौशिक आणि नीना गुप्ता हे एकाच कॉलेजमध्ये होते.

Neena Gupta : आज हिंदी फिल्मइंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी दु:ख व्यक्त करत आहेत. त्यांचे जवळचे मित्र अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आज सकाळीच पोस्ट शेअर करत त्यांच्या निधन झाल्याचं कळवलं. याशिवाय सतीश कौशिक यांची कॉलेजमधील मैत्रीण अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सतीश कौशिक आणि नीना गुप्ता हे एकाच कॉलेजमध्ये होते. त्यांच्यात खूप छान मैत्री होती. जेव्हा नीना गुप्ता लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्या तेव्हा सतीश कौशिक यांनी मी तुझ्या मुलीचा बाप आहे असं सांग अशी भूमिका घेतली होती. ते आपल्या मैत्रिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यांच्या अचानक जाण्याने नीना गुप्ता भावूक झाल्या आहेत.

निर्मात्याचे कोटी बुडवले, आले होते आत्महत्येचे विचार; सतीश कौशिक यांचा 'तो' वाईट काळ

 इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत  त्या म्हणाल्या, 'आजची सकाळ दु:खद बातमीने झाली आहे. सतीश कौशिक आपल्यात राहिले नाहीत. आमची कॉलेजपासूनची ओळख होती. तो मला नॅन्सी म्हणायचा आणि मी त्याला कौशिकन म्हणायचे. हे खूपच दु:खद आणि धक्कादायक आहे. त्याची छोटी मुलगी वंशिका आणि पत्नी शशी यांच्यासाठी हा कठीण काळ आहे. मी नेहमीच त्यांच्यासोबत आहे, देव त्यांना बळ देवो, विशेषत: वंशिकाला.'

मैत्रीसाठी कायपण! गर्भवती असलेल्या 'या' अभिनेत्रीशी लग्न करायला तयार झाले होते सतीश कौशिक

सतीश कौशिक यांचं आज दिल्लीतील गुरुग्राम येथे निधन झालं. काही वेळापूर्वीच फोर्टीस रुग्णालयात शवविच्छेदन पार पडले. काही वेळात त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील.

टॅग्स :नीना गुप्तासतीश कौशिकहृदयविकाराचा झटका