Join us

नागराजची पुन्हा ग्रामीण लव्हस्टोरी

By admin | Updated: July 18, 2015 04:39 IST

‘फॅँड्री’द्वारे वेगळ्या प्रकारची लव्हस्टोरी साकारत जातीय व्यवस्थेवर प्रहार करणारे नागराज मंजुळेंचा दुसरा चित्रपट येत आहे. ‘सैराट’ या नावाच्या चित्रपटातही

‘फॅँड्री’द्वारे वेगळ्या प्रकारची लव्हस्टोरी साकारत जातीय व्यवस्थेवर प्रहार करणारे नागराज मंजुळेंचा दुसरा चित्रपट येत आहे. ‘सैराट’ या नावाच्या चित्रपटातही त्यांनी ग्रामीण लव्हस्टोरी दाखविली आहे. पहिल्यावहिल्या ‘फँड्री’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उठवली. कथा आणि दिग्दर्शन त्यांचेच आहे, हे वेगळे सांगायला नको. नुकतेच त्याचे एडिटिंगचे काम पूर्ण झाले असून लवकरच चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे. ‘सैराट’ची कथा ही खरंतर ‘फँड्री’च्या पूर्वीच सुचली होती. पण त्या कथेचा जीव सापडत नव्हता़ त्यामुळे ती कथा बाजूला राहिली़ पण पुन्हा ती गवसल्याने त्याच्यावर काम सुरू केले आणि ती कथा आकाराली आली, असे सांगून विषय मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवला. सुरुवातीला अभिव्यक्त किंवा काहीतरी सांगण्यासाठी कविता करायचो, मग कथेकडे वळलो़ लेखन हा स्थायीभाव असला तरी सगळ्याच साहित्य प्रकारांत विहार करणे तसे सहज शक्य नसते.