Join us

नागराजची दाभोलकरांना डॉक्युमेंटरीद्वारे श्रद्धांजली

By admin | Updated: August 6, 2016 01:52 IST

सामाजिक भान असलेला दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे याची ओळख आहे.

सामाजिक भान असलेला दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे याची ओळख आहे. ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराजने महाराष्ट्रातील आणखी एका संवेदनशील विषयाला हात घातला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर तो डॉक्युमेंटरी बनवीत आहे. अंनिसच्या कार्यक्रमांना नागराज आवर्जून हजेरी लावतो. दाभोलकरांच्या हत्येला ३ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, त्यांचे सामाजिक कार्य लोकांसमोर येणार आहे.