Join us  

'नाच गं घुमा' पाहताना मी नव्हती म्हणून नम्रताने बाजूच्या सीटवर..; मुक्ता बर्वेने सांगितला भावूक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 1:59 PM

'नाच गं घुमा' पाहताना नम्रता संभेरावने केलेल्या भावूक गोष्टीचा उलगडा मुक्ता बर्वेने केलाय (naach ga ghuma, mukta barve, namrata sambherao)

'नाच गं घुमा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच लोकप्रिय झाला. या सिनेमात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांची प्रमुख भूमिका आहे. सिनेमाला तीन आठवडे उलटून गेले तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतोय. मुक्ता सिनेमाच्या रिलीजच्या वेळी भारतात नव्हती. त्यामुळे आता भारतात परतल्यावर मुक्ताने 'नाच गं घुमा'चं जोरदार प्रमोशन करायला सुरुवात केलीय. अशातच 'नाच गं घुमा'निमित्ताने लोकमत फिल्मीशी मुक्ताने संवाद साधला.

 मुक्ताने गप्पा मारताना सहअभिनेत्री नम्रता संभेरावविषयीचा एक भावूक किस्सा सांगितला. 'नाच गं घुमा' चं पहिलं स्क्रीनींग कास्ट आणि क्रूसोबत झालं. त्यावेळी मुक्ता अमेरिकेत असल्याने सिनेमाच्या स्क्रीनींगला उपस्थित नव्हती. नम्रता सिनेमा बघायला बसली तेव्हा तिने बाजूची एक सीट मुक्तासाठी रिकामी ठेवली होती. सिनेमा सुरु झाल्यावर नम्रताने हळूच मुक्ताला फोन केला.

नम्रताने मुक्ताला फोन केल्यावर हळू आवाजात म्हणाली, "ताई सिनेमा सुरु झालाय. बाजूची सीट रिकामी ठेवलीय तुझ्यासाठी. मला खूप रडू येतंय." नम्रता असं बोलताच मुक्ताही पलीकडून "मलाही खूप रडू येतंय." असं म्हणाली. अशाप्रकारे मुक्ताने भावूक किस्सा सांगितला. 'नाच गं घुमा' सिनेमात मुक्ताने राणी आणि नम्रताने आशाताईंची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :मुक्ता बर्वेनम्रता आवटे संभेराव