Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रेकॉर्डवर लिप सिंक करणे म्हणजे जॉगिंगसाठी....', सलील कुलकर्णींची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 13:33 IST

गायक, संगीतकार, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

गेल्या काही वर्षात संगीत क्षेत्रातील लाइव्ह कॉन्सर्ट होण्याचं प्रमाणही वाढत आहे. अनेक दिग्गज गायक त्यांच्या गाण्यांचे लाइव्ह कार्यक्रम देशात-विदेशात करतात. अशा कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसादही चांगला मिळतो. मात्र या लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक स्वत: गाणं गातात की मागून रेकॉर्ड लावतात, असा प्रश्न विचाराला जातो. आता यावरील गायक, संगीतकार, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.  

सलील कुलकर्णी यांचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांच्या या गाण्याच्या कार्यक्रमवर रसिक प्रेक्षकांनी भरुभरुन प्रेम केलं. गेले अनेक वर्षे त्यांनीही गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. सलील कुलकर्णी नेहमीच त्यांचं मतं सोशल मीडियावर मांडत असतात. आता अशाच लाईव्ह गाण्यांच्या शोजवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सलील कुलकर्णी यांच्या एक पोस्टनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. live Concert जाहीर करून रेकॉर्ड लावून लिप सिंक करणे म्हणजे जॉगिंगसाठी निघून कॅब करण्यासारखं आहे. सगळ्यांचीच फसवणूक…यासोबतच त्यांनी निरीक्षणे हा हॅशटॅगही वापरला आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 

टॅग्स :सलील कुलकर्णीसेलिब्रिटीसंगीत