Join us

Mumbai Cruise Drugs Case: शाहरूख खानला बसणार मोठा फटका; पोराच्या कारनाम्यामुळं बापाचं होणार नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 06:00 IST

५,११६ कोटींची संपत्ती, जगातील तिसरा सर्वांत श्रीमंत कलाकार म्हणून शाहरुख खानची ओळख आहे.

मुंबई - बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान क्रुझवरील रेव्ह पार्टीत सापडल्यामुळे आता स्वतः शाहरुखच्या अडचणीत वाढ झाली आहे. केवळ मुलाला सोडवण्यापुरता डोक्याला ताप राहिलेला नसून, ज्या ब्रँडच्या जाहिराती स्वतः शाहरुख करतोय, त्यांच्यावरही काही प्रमाणात गंडांतर येण्याची शक्यता आहे.  

शाहरूख फोर्ब्सच्या जाहीर यादीनुसार जागातील कमाईच्या टॉप १० कलाकारांच्या यादीत शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांचे नाव आहे. शाहरुख खानची संपत्ती ५११६ कोटी असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. जॅरी सॅनफिल्ड आणि टायलर पॅरी या दोघांनंतर शाहरुख जगातील तिसरा सर्वांत श्रीमंत कलाकार आहे.

शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू किती?३७८ कोटी रुपये एवढी शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू आहे. फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार भारतातील सेलिब्रिटींच्या तुलनेत ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत शाहरुख चौथ्या स्थानी आहे. ४० ब्रँड्ससाठी सध्या शाहरुख काम करतो. त्यांचीही आता खिल्ली उडवली जात आहे.

एका दिवसाच्या शूटिंगचे किती रुपये?असं म्हणतात की, कोणता ब्रँड आहे आणि किती प्लॅटफॉर्मवर त्या ब्रँडचं एंडोर्समेंट केलं जाणार आहे, त्यानुसार शाहरुखचा मोबदला ठरतो. एका दिवसाच्या ॲड शूटिंगसाठी तो किमान १ कोटी रुपये घेतो.

टॅग्स :शाहरुख खानआर्यन खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी