Join us

मल्टीस्टारर चित्रपट करणार नाही : अली

By admin | Updated: August 12, 2014 14:43 IST

‘बॉबी जासूस’मध्ये विद्या बालनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार्‍या अली फजल याने आता मल्टीस्टारर चित्रपटांना नकार देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘बॉबी जासूस’मध्ये विद्या बालनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार्‍या अली फजल याने आता मल्टीस्टारर चित्रपटांना नकार देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीने ‘थ्री इडियटस्’ आणि ‘फुकरे’सारख्या मल्टीस्टारर चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता त्याला मुख्य भूमिका करण्याची इच्छा आहे. अलीने सांगितले की, ‘मी आगामी दोन चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत आहे. लोक आता माझ्यावर विश्‍वास ठेवू लागले आहेत. माझे आजवर रिलीज झालेले चित्रपट एक तर मल्टीस्टारर होते किंवा माझी भूमिका मध्यवर्ती नव्हती. आता मला हे बदलायचे आहे.’ महेश भट्ट प्रोडक्शनचा खामोशियाँ आणि सोनाली केबल हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. यापूर्वी त्याने होमलँड ही हॉलीवूड सिरीज करायला नकार दिला होता.