Join us

झाले बहु... होतील बहु परी या सम हाच...

By admin | Updated: September 14, 2016 12:39 IST

आज डॉ. घाणेकरांचा जन्मदिन.. त्यानिमित्ताने प्रसिद्ध अभिनेते सतिश सलागरे यांच्या बरोबर गप्पा किंवा चर्चे दरम्यान डॉक्टरांबद्दल ऐकलेले काही किस्से.....

- समीर सप्रे
 
आज डॉ. घाणेकरांचा जन्मदिन.. त्यानिमित्ताने प्रसिद्ध अभिनेते सतिश सलागरे यांच्या बरोबर गप्पा किंवा चर्चे दरम्यान डॉक्टरांबद्दल ऐकलेले काही किस्से..... 
 
सामाजिक जाणीव हा डॉक्टरांमधील मोठा गुण.....
वर्षभरातील नाटकातून मिळणा-या मानधनातून ते ठराविक रक्कम ते शरीर विक्रय करणाऱ्या महिलांसाठी खर्च करायचे, त्यांची वैद्यकिय तपासणी वैगेरे करुन घेण्याकरीता हि रक्कम ते वापरत असत.... तेही निरपेक्ष बुद्धीने.
शरिर विक्रय हा नाईलाजाने सुरु असलेला व्यवसाय असतो.... परंतु त्यांना समाजात मानाने जगण्याचा अधिकार असतो... ह्या भावनेतूनच डॉ. घाणेकर शरिर विक्रय करणा-या महिलांना मदत करायचे.....
अशी सामाजिक जाणीव असणारा आजच्या व्यावहारीक जगात मिळणे विरळाच....
 
डॉ. घाणेकरांचे नाट्यप्रेम सर्वश्रुतच होते. कोकणातील दापोली येथील नाट्यगृहाचे "रसिक रंजन" हे नाव डॉ. घाणेकरानी दिले आहे. या नाट्यगृहाची बैठक व्यवस्था हि त्यांनी स्वत: लक्ष घालुन तयार केली होती. प्रेक्षागृहातील सर्व कोप-यातुन रंगमंचावरील नट दिसला पाहिजेच असा त्यांचा आग्रह असायचा. या साठी ते प्रेक्षागृहातील सर्व कोप-यात जाऊन बैठक व्यवस्थेची पहाणी करायचे.... 
प्रेक्षक नाटक आणि त्यातील कलाकारांचा अभिनय पहायला तिकिट काढुन येतो.... तो पडदे पहायला येत नाही असे ते व्यवस्थापकाला ठणकावून सांगत असत.....ज्या कोप-यातुन रंगमंचावरील नट दिसत नसेल त्या कोप-यांतील खुर्च्या ते काढुन टाकायला लावत असत....व्यवस्थापकाने फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार न करता रसिकांचाही विचार करावा असा ते सल्ला द्यायचे...
 
आपल्या अजरामर भूमिकांमधून नाट्यरसिकांना वेड लावणा-या या अनिभिषिक्त सम्राटाच्या प्रेमात केवळ महाराष्ट्राच नव्हे तर थेट बॉलीवुड आणि राजकीय व्यक्ति सुद्धा पडल्या होत्या. 
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, शो मॅन राज कपुर, प्रसिद्ध अभिनेते दिलिप कुमार यासह अनेक मान्यवरांनी डॉ. घाणेकरांच्या नाटकांना हजेरी लावली होती.... 
असा हा अद्वितिय प्रतिभेचा नटसम्राट  ज्यांना पाह्यला मिळाला ते नशिबवानच.....
खुद्द नटराज सुद्धा ह्या सम्राटाच्या प्रेमातच पडला असावा त्यामुळेच अपेक्षेपेक्षा लवरकरच ह्या नटसम्राटांने जगाच्या या रंगभूमी वरुन एक्झिट घेतली असावी.