Join us  

Mukesh Khanna Besharam Rang : 'आज अर्ध्या कपड्यात आणि उद्या..' भगव्या बिकीनीवरुन 'शक्तिमान' भडकले; सेंसर बोर्डावरही घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 3:18 PM

दीपिकाने भगवा रंगाची बिकीनी घातल्याने गदारोळ झाला आहे. काही लोक प्रचंड विरोध करताना दिसत आहेत, तर काही समर्थनही करत आहेत.

Mukesh Khanna Besharam Rang : पठाणच्या 'बेशरम रंग' (Besharam Rang) गाण्याने सध्या चांगलाच धुमाकुळ घातलाय. दीपिकाने भगवा रंगाची बिकीनी घातल्याने गदारोळ झाला आहे. काही लोक प्रचंड विरोध करताना दिसत आहेत, तर काही समर्थनही करत आहेत. आता या गाण्यावर शक्तिमान फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनीही आक्षेप घेतला आहे.

मुकेश खन्ना भडकले 

बेशरम गाणे आणि त्यातली दीपिकाती भगव्या रंगाची बिकीनी यामुळे पठाण बॉयकॉट होण्याच्या मार्गावर दिसतोय. हिंदू संघटनांनी सिनेमाला कडाडून विरोध केलाय. आता शक्तिमान फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी वादात उटी घेतली आहे. ते म्हणाले, ' आजकालची मुलं टीव्ही आणि सिनेमे बघून मोठी होत आहेत. यामुळे सेंसर बोर्डाने अशा गाण्यांना परवानगीच नाही दिली पाहिजे. सेंसर बोर्ड काही सर्वोच्च न्यायालय नाही की त्याचा विरोध करता येऊ शकत नाही.'

ते पुढे म्हणाले, आपला देश काही स्पेन नाही बनलाय जिथे अशा प्रकारची गाणी चालतील. सध्या अर्ध्या कपड्यात गाणी बनवली जात आहेत. काही दिवसांनंतर कपड्यांविना गाणी बनतील. मला कळत नाही सेंसर बोर्ड अशा गाण्यांना परवानगीच कसे देऊ शकते.'

Pathaan Movie : 'मग तो शाहरुख खान का असेना..' हिंदू संघटनेनंतर मुस्लिम संघटनांचाही 'पठाण' ला विरोध

ड्रेस डिझाईन करणाऱ्यांना माहित नाही का भगवा रंगाचे हिंदू धर्मात महत्व काय आहे. शिवसेनेच्या झेंड्यातही भगवा आहे, आरएसएस मध्येही आहे. अमेरिकेत तर त्यांच्या झेंड्याची सुद्धा बिकीनी घातलेली चालते. पण हिंदुस्तानात तुम्ही असे करु शकत नाही. यापुर्वी अभिनेत्रींनी भगव्या रंगाची बिकीनी नव्हती परिधान केली. आता सोशल मीडियामुळे लोक आवाज उठवत आहेत.

टॅग्स :मुकेश खन्नापठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोणहिंदीसिनेमाट्रोल