Join us  

महेंद्र सिंह धोनीला आजिबात आवडत नव्हती सुशांतसिंह राजपूतची 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 2:25 PM

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती.

बॉलिवूडचा यंग आणि टॅलेंटेड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आज या जगात नसेल, पण तो त्याच्या चाहत्यांच्या हृदयात आठवणीच्या रुपात सदैव जिवंत आहे. टीव्ही ते मोठा पदडा असा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता.  एमएस धोनीचा बायोपिक 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मधून त्याला मोठा ब्रेक मिळाला. धोनीला मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती.  या सिनेमात माहीची भूमिका साकारणाऱ्या सुशांतसोबत धोनीची खास मैत्री झाली होती.  पण एकदा धोनी सुशांतवर चिडला होता. तर त्यामागे काय कारण होतं हे आपण जाणून घेऊया. 

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती. धोनीच्या अनेक गोष्टी सुशांत शिकत होता. पण एक अशी वेळ आली होती. जेव्हा  धोनी सुशांतवर चिडला होता. याचा खुलासा 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान झाला होता. तर याबद्दल बोलताना धोनी म्हणाला होता,  'सुशांत एकच प्रश्न बऱ्याच वेळा विचारायचा. सारखी उत्तर मिळाल्यानंतर त्याला ते खरं वाटायचं. तेव्हाच तो दुसऱ्या प्रश्नावर जायचा.  मला सुरुवातीला स्वत:बद्दल इतकं बोलणं थोडं खटकत होतं. मला कंटाळा यायचा, त्यामुळं मी त्याच्यावर चिडायचो'.

याबद्दल बोलताना सुशांत म्हणाला होता की, 'मी धोनीला पहिल्यांदाच असं चिडताना पाहिलं होतं. पहिले दोन-तीन दिवस मी त्याला काही प्रश्न विचारले. त्याची त्यांनी शांतपणे उत्तरंही दिली. पण नंतर तो म्हणाला की, तू खूप प्रश्न विचारतोस. मी ब्रेक घेऊन पुन्हा येतो.  मी त्याला एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं विचारायचो. त्याला माझं हे प्रश्न विचारणं फार आवडायचं नाही.

सुशांत ने 'एमएस धोनी' सिनेमात दिग्गज विकेटकीपर फलंदाजाप्रमाणे केसांची स्टाइल केली होती. तासंतास त्याने विकेटकीपिंग करण्यात घालवले, अनेक व्हिडीओ पाहिले आणि मग त्यानं पात्र जिवंत केले. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांतला माजी भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे यांनी प्रशिक्षण दिलं होतं. सुशांतचा हा सिनेमा २०१६मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात कियारा आडवाणी आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसेलिब्रिटीबॉलिवूडएम. एस. धोनी