Join us

मृणालची लगीनघाई

By admin | Updated: February 25, 2016 03:37 IST

‘माझिया प्रियाला प्रीत मिळेना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचणारी शमिका म्हणजेच मृणाल दुसानिस, रियल लाइफमध्येदेखील बोहल्यावर चढणार आहे. यासाठी तिची जय्यत

‘माझिया प्रियाला प्रीत मिळेना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचणारी शमिका म्हणजेच मृणाल दुसानिस, रियल लाइफमध्येदेखील बोहल्यावर चढणार आहे. यासाठी तिची जय्यत तयारीदेखील सुरू झाली आहे. नुकतेच मृणालने लग्नाची खरेदी करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. यात ती ज्वेलरी व काही कपडे खरेदी करताना दिसत आहे. सध्या ती ‘असं सासर सुरेख बाई’ या मालिकेतून जुईची भूमिका करीत आहे. चला तर, तिला सुरेख सासरी जाण्यासाठी लग्नाच्या शुभेच्छा देऊयात...