Join us
Daily Top 2Weekly Top 5

लालूप्रसाद यादव यांच्या नावावर बनला होता चित्रपट

By admin | Updated: November 12, 2015 00:17 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत किंगमेकर म्हणून चमकलेले लालूप्रसाद यादव यांचा बॉलीवूडशीदेखील जवळचा संबंध आहे. २००५ मध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पद्मश्री लालू प्रसाद यादव’ या नावाने एक चित्रपट आला होता

बिहार विधानसभा निवडणुकीत किंगमेकर म्हणून चमकलेले लालूप्रसाद यादव यांचा बॉलीवूडशीदेखील जवळचा संबंध आहे. २००५ मध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पद्मश्री लालू प्रसाद यादव’ या नावाने एक चित्रपट आला होता, ज्यात प्रमुख भूमिकेमध्ये सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, मौसमी मखीजा, किम शर्मा, अनुपमा वर्मा आणि स्वत: महेश मांजरेकर होते. चित्रपटाच्या कथेचा लालूप्रसाद यादव यांच्या जीवनाशी काही संबंध नव्हता. ही कथा लालू, प्रसाद आणि यादव या तीन वेगवेगळ््या भूमिकांची होती, ज्यांच्यामध्ये पद्मश्री नावाची एक तरुणी होती. तरीदेखील लालू यांचे नाव लागल्याने चित्रपटाची देशभरात चर्चा झाली आणि इतकेच नव्हे, चित्रपटाची टीम स्वत: पटणा येथे गेली आणि लालूप्रसाद यादव यांना भेटली. लालू यांनी चित्रपटाची प्रशंसादेखील केली. मात्र, बॉक्स आॅफिसवर चित्रपटाचे काही भले झाले नाही. बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हासोबत लालू यांच्या संबंधात चढ-उतार राहिला आहे. एक काळ होता, जेव्हा लालू यांना शत्रुघ्न लल्लू म्हणत होते. त्या काळात शत्रू यांचे राजकारणाशी थेट संबंध नव्हते. भाजपामध्ये सहभागी होऊन राजकीय प्रवास सुरू करणारे शत्रुघ्न, खूप काळ आपल्या शैलीत लालू यांची मस्करी करीत असत. मात्र, काळ बदलला, तर शत्रुघ्न सिन्हांचे शब्द आणि शैलीदेखील बदलली. आता ते लालूंची प्रशंसा करतात आणि त्यांना बिहार, तसेच देशाचा एक मुरब्बी, सन्मानित नेता मानतात आणि त्यांना आपले जवळचे, पारिवारिक मित्रही म्हणतात. शत्रुघ्न यांच्याशिवाय लालू यांचे मनोज वाजपेयी, रवी किशन, शेखर सुमन आणि प्रकाश झा यांच्यासोबतही जवळचे संबंध आहेत. शेखर सुमन यांनी तर लालू यांची नकल करण्याची एकही संधी हातातून सोडली नाही. लालू यांचे एक कनेक्शन बॉलीवूडचा किंग खान शाहरुखसोबतही राहिले आहे. शाहरुखने जेव्हा स्टार प्लसवर ‘पांचवी पास’ नावाने शो केला, तर लालू त्या शोेमध्ये पाहुणे म्हणून आले आणि त्यात त्यांनी शाहरुखची जोरदार फिरकी घेतली. फारुख शेख यांचा मेजबानी शो जीना इसी का नाम हैमध्येदेखील लालूप्रसाद यादव हे आपल्या परिवारासोबत सहभागी झाले होते. जिथपर्यंत चित्रपटाच्या पडद्याचा विषय आहे, तर लालू यांच्या नकलेच्या भूमिका कितीतरी चित्रपटात दिसल्या आहेत. कादरखानपासून शक्ती कपूर आणि परेश रावलपर्यंत अनेक कलाकारांनी लालूंच्या शैलीत अनेक भूमिकांना कॉमेडीच्या रंगात रंगविले आहे. परेश रावल यांनी अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांच्या ‘जिगर’ चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती, त्यात त्यांच्या भूमिकेची शैली आणि संवाद सादरीकरण लालूप्रसाद यादवांसारखे होते. बॉलीवूडमध्ये आणखी एक दंडनायक चित्रपट आला होता, ज्यात परेश रावल यांनी लालू प्रसादसारखी भूमिका केली होती. लालूप्रसाद यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे प्रकाश झा यांनी ज्या वेळी ‘गंगाजल’ चित्रपट केला, तर याबाबत मोठा हंगामा झाला होता की, या चित्रपटात खलनायकाचे नाव साधू यादव होते, जे खरोखर लालू यांच्या शालकाचे नाव आहे. हा वाद लालूंपर्यंत पोहोचला मात्र, लालू यांनी चित्रपटाला हिरवा झेंडा दाखविला की, या भूमिकेचे त्यांच्या परिवाराशी काही कनेक्शन नाही. छोट्या पडद्याचा विचार केला, तर मोजकेच कॉमेडी कॅरेक्टर असो वा स्टँड अप कॉमेडियन असो, ज्यांनी लालंूंची नक्कल केली नसेल. कपिल शर्मापासून कृष्णापर्यंत सर्व कलाकारांनी आपल्या पद्धतीने लालूंच्या नावावर प्रेक्षकांना हसविण्याचे काम केले आहे.