प्रत्येक लव्हस्टोरी ही वेगळी असते; त्यामुळे प्रेक्षकांना ती हवीहवीशी वाटते आणि ज्या चित्रपटात अॅक्शन प्लस ट्रँगल लव्हस्टोरी असेल त्याला चार चाँद लागल्याशिवाय राहत नाहीत. असाच वेगळा आशय घेऊन आलेला ‘फक्त तुझ्यासाठीच’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी चित्रपटात काम केलेला यश कपूर हा ‘फक्त तुझ्यासाठीच’ या चित्रपटामधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटाबद्दल लोकमत सीएनएक्सशी बोलताना यश म्हणाला, की ‘फक्त तुझ्यासाठीच’ या चित्रपटाची वेगळी कथा असल्यामुळे तो साकारताना नवे आवाहन पेलताना खूप मजा आली. अॅक्शन चित्रपट असल्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागली. सेटवर रोज नवनवीन गोष्टी प्रत्येकाकडून शिकायला मिळाल्या. नवीन टीमसोबत काम करताना मजा आली. तसेच लीना बी ही लीड रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे निर्माते स्वपन रे असून, दिग्दर्शन प्यारेलाल शर्मा आणि जगन्नाथ रंगधोप यांनी केले आहे. तर, या चित्रपटात नफे खान, सिया पाटील, अंकिता तारे, विवाश उजावणे, अंजली उजावणे या कलाकारांचादेखील सामावेश असेल. हा चित्रपट २२ जुलै रोजी प्रदर्शित होईल.
ट्रँगल लव्हस्टोरी असणारा चित्रपट ‘फक्त तुझ्यासाठीच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 02:57 IST