Join us  

सावन बरसे तरसे दिल...! मराठी कलाकारांचे मान्सून व्हिडीओ पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 8:00 AM

Marathi Celebrities Enjoying Monsoon : काहीजण पाऊस खिडकीतून अनुभवतात तर काहीजण मस्त भिजत लाँग ड्राईव्हला निघतात. आपले मराठी सेलिब्रिटी पाऊस कसा अनुभवतात? तर त्यासाठी तुम्हाला त्यांचे व्हिडीओ बघावे लागतील...

Marathi Celebrities Enjoying Monsoon : पावसाळा सुरू झाल्यावर एक वेगळाच फील येतो. पाऊस म्हणजे, चिंब चिंब भिजणं.... पाऊस म्हणजे, वाफाळलेला चहा... पाऊस म्हणजे, गरमागरम कांदीभजी... पाऊसमध्ये गाणी... पाऊस म्हणजे आठवणी... पाऊस म्हणजे धम्माल मस्ती... पावसाची वेगळीच मज्जा असते. काहीजण पाऊस खिडकीतून अनुभवतात तर काहीजण मस्त भिजत लाँग ड्राईव्हला निघतात. आपले मराठी सेलिब्रिटी पाऊस कसा अनुभवतात? तर त्यासाठी तुम्हाला त्यांचे व्हिडीओ बघावे लागतील.

 सावन बरसे तरसे दिल... 

अभिनेत्री प्राजक्ता माळी लोणावळ्यात पाऊस अनुभवतेय.  सावन बरसे तरसे दिल... असं म्हणतप्राजक्ताने  तिथला व्हिडीओ शेअर केला आहे. 

मैं जानू ना जानू ना.. जानू ना...

सैराट फेम रिंकू राजगुरूने पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणाचा असा आनंद घेतला. तिने एक मस्त व्हिडीओ शेअर केला आहे...

साथ हम जो चले...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने पावसाळ वातावरणात धम्माल मज्जा केली.  रसिका वेंगुर्लेकर, प्रसाद खांडेकर, वनिता खरात आणि रोहित माने सगळे मस्त धम्माल डान्स करत असतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

हे तुझ्या सवे, तुझ्यासवे क्षण माझे...

तुमच लाडकी स्वीटू अर्थात अन्विता फलटणकर. अन्विताने मुंबईच्या पावसात लॉन्ग ड्राईव्हचा आनंद घेतला.  पावसात   मरीन ड्राइव्हवरचा सुंदर व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

कितनी हसी जिंदगी है ये...

अभिनेत्री मयुरी देशमुख आपल्या बेस्टीज्सोबत पावसाचा आनंद लुटला... तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

तुझे याद कर लिया है...

तुमची मुलगी काय करते फेम हरीश दुधाडेनं पावसाचा असा मस्त आनंद घेतला. पाऊस आणि चहा... असा मनसोक्त पाऊस त्याने अनुभवला.

एक डान्स तो बनता ही है...! 

अभिनेत्री ऋतुजा बागवे,अश्विनी कासार यांची पावसाळी ट्रीप धम्माल रंगतेय. ऋतुजा नाशिकला मित्र-मैत्रिणींबरोबर गेली आहे. मग मित्रांसोबत एक डान्स तो बनता ही है...! 

तू, मी आणि पाऊस...

अभिनेत्री ऋचा आपटे व तिचा पती क्षितिज दाते या जोडप्यानं थेट महाबळेश्वर गाठलं. सोबतीला पाऊस घेऊन त्यांनी प्रतापगड सर केला.  

 सुन भवरा...

बॉस माझी लाडाची फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचा हा मान्सून व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा.  

टॅग्स :सेलिब्रिटीरिंकू राजगुरूप्राजक्ता माळीभाग्यश्री लिमेयटेलिव्हिजन