Join us

ये है मोहब्बतेच्या सेटला आग

By admin | Updated: October 25, 2014 23:45 IST

साकीनाका परिसरात शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत एकता कपूरच्या ये है मोहब्बते या टीव्ही मालिकेचा सेट जळून कोळसा झाल्याची बातमी आहे.

साकीनाका परिसरात शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत एकता कपूरच्या ये है मोहब्बते या टीव्ही मालिकेचा सेट जळून कोळसा झाल्याची बातमी आहे. दिवाळीच्या सुटीमुळे सेटवर कोणीही उपस्थित नसल्याने कोणीही जखमी नसल्याचे समजते. साकीनाकाजवळ चांदिवली येथे क्लिक निक्सन नावाचा स्टुडिओ असून तेथे टीव्ही मालिकांचे शूटिंग होत असते. तेथे एकता कपूरच्या जवळपास 1क् टीव्ही मालिकांचे सेट आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता गोदामात आग लागली आणि पुढे ती ये है मोहब्बतेच्या सेटर्पयत पोहोचली. आगीची बातमी मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा आणि दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले. ये है मोहब्बते मालिकेतील मुख्य कलाकार दिव्यांका त्रिपाठीने टि¦ट केले आहे की,‘ सर्व कलाकार आणि क्रु मेंबर्स सुरक्षित आहेत.’