Join us

'मोगैंबो खुश हुआ'! ७ दिवसांत तयार झालेल्या अमरीश पुरींच्या या कॉस्ट्युमसाठी खर्च झाले होते लाखों रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:24 IST

Amrish Puri : १९८७ साली दिग्दर्शक शेखर कपूर आणि निर्माते बोनी कपूर यांचा 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेते अमरीश पुरी यांनी 'मिस्टर इंडिया'मध्ये 'मोगैंबो'ची भूमिका केली होती. खलनायकाच्या या भूमिकेत आपल्या दमदार संवाद आणि अभिनयाच्या बळावर पुरी यांचे हे पात्र आजही अमर आहे.

१९८७ साली दिग्दर्शक शेखर कपूर आणि निर्माते बोनी कपूर यांचा 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवीसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर, सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अमरीश पुरी यांनी 'मिस्टर इंडिया'मध्ये 'मोगैंबो'ची भूमिका केली होती. खलनायकाच्या या भूमिकेत आपल्या दमदार संवाद आणि अभिनयाच्या बळावर पुरी यांचे हे पात्र आजही अमर आहे. आज आम्ही तुम्हाला 'मिस्टर इंडिया'मधील 'मोगैंबो'च्या वेशभूषा निर्मितीची एक रंजक कहाणी सांगणार आहोत. हा आउटफिट तयार होण्यासाठी ७ दिवसांचा वेळ लागला होता आणि डिझायनरने यासाठी तगडं मानधन घेतलं होतं.

खरं तर, 'मिस्टर इंडिया'मधील खलनायक 'मोगैंबो'चा लूक प्रसिद्ध डिझायनर माधव अगस्ती यांनी डिझाइन केला होता. अगस्ती यांनी यामागची कहाणी त्यांच्या 'स्टिचिंग स्टारडम: फॉर आइकॉन्स, ऑन अँड ऑफस्क्रीन्स' या पुस्तकात सविस्तरपणे सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, "चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर आणि निर्माते बोनी कपूर माझ्या शॉपवर आले होते. त्यांनी मला सांगितले की त्यांना एका अशा खलनायकाचा कॉस्ट्यूम तयार करायचा आहे, ज्यात परदेशी हुकूमशहा आणि देशी जमीनदार यांचा मिलाफ असेल."

कॉस्ट्यूम बनवण्यासाठी घेतलं इतकं मानधनते पुढे म्हणाले की, "यासाठी आम्ही परदेशी वर्तमानपत्रे, मासिके आणि चित्रपटांच्या इतिहासाच्या पुस्तकांवर खूप संशोधन केले. त्यातून अनेक कटिंग्ज काढले आणि त्यानंतर 'मोगैंबो'च्या वेशभूषेचा डिझाइन निश्चित केला. ज्यामध्ये काळ्या रंगाच्या कोटावर सोनेरी मोनोग्रामचा प्रिंट असलेला कोट, लांब फ्रिलचा शर्ट आणि लांब बूटसारखे शूज वापरले गेले. अशा प्रकारे अमरीश पुरी यांचा 'मोगैंबो'चा कॉस्ट्यूम तयार झाला. हा कॉस्ट्यूम बनवण्यासाठी ७ दिवसांचा वेळ लागला आणि मी अंदाजे २५ हजार रुपये फी घेतली. परंतु, माझी कलाकारी पाहून बोनी कपूर खूप खूश झाले आणि त्यांनी मला बक्षीस म्हणून १० हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली. अशा प्रकारे 'मोगैंबो'ची वेशभूषा तयार करण्यासाठी मला एकूण ३५ हजार रुपये मिळाले."

अमरीश पुरींची अशी होती प्रतिक्रियायाच पुस्तकात माधव अगस्ती यांनी पुढे उल्लेख केला आहे आणि सांगितले की, जेव्हा अमरीश पुरी यांनी पहिल्यांदा 'मोगैंबो'चा कॉस्ट्यूम पाहिला, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती. ते म्हणाले, "अमरीश पुरी साहेबांच्या लूक टेस्टसाठी त्यांना माझ्याद्वारे बनवलेला 'मोगैंबो'चा कॉस्ट्यूम परिधान करण्यात आला. ते त्या लूकमध्ये खूपच शानदार दिसत होते आणि तो घातल्यानंतर पुरी साहेबांच्या तोंडून फक्त एवढेच निघाले, 'मोगैंबो खुश हुआ'."

English
हिंदी सारांश
Web Title : 'Mogambo Khush Hua!': Lakhs spent on Amrish Puri's iconic costume.

Web Summary : Amrish Puri's Mogambo costume for 'Mr. India' was designed by Madhav Agasti. The outfit, blending foreign dictator and desi landlord elements, took seven days to create and cost ₹35,000, impressing both Boney Kapoor and Amrish Puri.
टॅग्स :अमरिश पुरी