Join us

मिथिला पालकरचा सेल्फी होतोय व्हायरल, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 18:00 IST

आतापर्यंत या फोटोला २ लाख ४२ हजाराहुन अधिक लाईक्स आले आहेत.

गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते. मिथिलाने तिचा एक सेल्फिवाला फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. आतापर्यंत या फोटोला २ लाख ४२ हजाराहुन अधिक लाईक्स  या फोटोला आतापर्यंत आले आहेत. सध्या मिथिलाच्या या फोटोची सोशल मीडियावरदेखील चांगलीच चर्चा आहे.

मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. मिथिलाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मिथिलाने पिच रंगाचा टॉप परिधान केले आहे आणि स्मित हास्य देतेय. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

टॅग्स :मिथिला पालकर