Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मिस यू सर’ : रितेश

By admin | Updated: November 5, 2014 00:41 IST

रितेश देशमुख अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांच्या निधनाने खूप दु:खी आहे. ‘बँकचोर’ या चित्रपटात रितेशसोबत सदाशिव अमरापूरकर यांचीही भूमिका होती

रितेश देशमुख अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांच्या निधनाने खूप दु:खी आहे. ‘बँकचोर’ या चित्रपटात रितेशसोबत सदाशिव अमरापूरकर यांचीही भूमिका होती. यशराज फिल्म्सने या चित्रपटासाठी त्यांना साईन केले होते. रितेशने टिष्ट्वट के ले की, ‘आरआयपी सदाशिव अमरापूरकर एक महान कलावंत आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्त्व. मी त्यांच्यासोबत ‘बँकचोर’मध्ये काम करणार होतो. मिस यू सर.’ त्याने पुढे लिहिले की, ‘त्यांचा ‘अर्धसत्य’, ‘सडक’ या चित्रपटांतील अभिनय प्रेरणादायी होता. आमचे मनोरंजन करण्यासाठी धन्यवाद सर.’ फुप्फुसांचे संक्रमण झाल्याने उपचार घेत असताना सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले.