‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान राजकोटमध्ये दाखल झाला. गोंडल येथे सिनेमाचे शूटिंग लवकरच होणार आहे. या वेळी सलमानसोबत त्याचा डुप्लिकेट परवेज काजीसुद्धा होता. परवेज हुबेहूब सलमानसारखा दिसतो. त्यामुळे लोक त्याला बघून खूपच आश्चर्यचकित झाले. या चित्रपटात परवेज सलमानसोबत झळकणार आहे. परवेजने सांगितले, की या सिनेमात सलमान दुहेरी भूमिकेत आहे. त्यामुळे मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
मि. दबंगचा डुप्लिकेटही फॉर्मात!
By admin | Updated: February 23, 2015 22:38 IST