Join us  

Milind Soman : कला की अश्लिलता? ‘बेशरम रंग’चा वाद सुरू असताना मिलिंद सोमणला आठवलं ‘ते’ न्यूड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:39 AM

Pathaan Besharam Rang Controversy, Milind Soman : ‘बेशरम रंग’ या गाण्यानं नवा वाद ओढवून घेतला आहे. आता मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण याने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

Pathaan Besharam Rang Controversy, Milind Soman : शाहरूख खानच्या ‘पठाण’ या सिनेमाचा वाद तापला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यानं नवा वाद ओढवून घेतला आहे. मुळातच हे गाणं अश्लिल आहे, असा अनेकांचा आक्षेप आहे. शिवाय या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरूनही लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्थात या वादात शाहरूख व दीपिकाला सपोर्ट करणारेही काही जण आहेत. आता फिटनेस फ्रिक मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण याने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘बेशरम रंग’ या गाण्यावर अश्लिलता पसरवण्याचा आरोप होत आहे. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद यावर बोलला. यावर बोलताना त्याला त्याने एकेकाळी केलेल्या न्यूड फोटोशूटचीही आठवण झाली. या न्यूड फोटोशूटमुळे मिलिंदवर 14 गुन्हे दाखल झाले होते. 

काय म्हणाला मिलिंद?ही अश्लिलता आहे की कला? यावर कोर्ट निर्णय देईल. शेवटी हा मुद्दा निकाली निघायला हवा. कोणीही कधीही पूर्णपणे समाधानी होऊ शकत नाही. त्या कॉन्ट्रोवर्सीवर (न्यूड फोटोशूट) माझ्या आयुष्यातील 14 वर्षे  खर्च झालेत. बोलण्याचं स्वातंत्र्य असायलाच हवं. प्रत्येकाला स्वत:चे विचार असायला हवेत. लोक काहीही आक्षेपार्ह बोलत असतील तर त्यावर कायदा निर्णय घेईल, असं मिलिंद सोमण म्हणाला.

काय होता न्यूड फोटोशूटचा वाद1995 मध्ये एका शूज तयार करणाऱ्या एका कंपनीने मॉडेल मधु सप्रे व मिलिंद सोमण या दोघांना घेऊन एक न्यूड फोटोशूट केलं होत. मुळात ही एक जाहिरात होती.  आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त जाहिरातींमध्ये या जाहिरातीचा समावेश होतो. 

मधु आणि मिलिंद या जाहिरातीमध्ये न्यूड झाले होते. पायात बुट आणि गळ्यात अजगर असं हे फोटोशूट होतं. या न्यूड जाहिरातीवरून प्रचंड वाद झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ऑगस्ट 1995 मध्ये मधु व मिलिंदविरोधात गुन्हाही दाखल केला होता. जाहिरातीत अजगराच्या वापरावरही टीका झाली होती. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅक्टअंतर्गत संबंधित जाहिरात कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला गेला होता. तब्बल 14 वर्षे हा खटला सुरु होता. अखेर 14 वर्षांनी मिलिंद व मधु दोघांनाही निर्दोष ठरवलं गेलं होतं. 

टॅग्स :मिलिंद सोमण पठाण सिनेमादीपिका पादुकोणशाहरुख खानबॉलिवूड