Join us

#MeToo : कैलाश खेरवर पुन्हा नवा आरोप, तोशी साबरीही अडकला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 13:03 IST

आत्तापर्यंत दोन महिलांनी कैलाश खेरवर गंभीर आरोप केलेत. आता आणखी एका गायिकेने कैलाश खेरवर गंभीर आरोप केला आहे.

मीटू’ मोहिमेअंतर्गत गायक कैलाश खेरवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेत. आत्तापर्यंत दोन महिलांनी कैलाश खेरवर गंभीर आरोप केलेत. सर्वप्रथम एका फोटो जर्नलिस्टने कैलाश खेरवर गैरवर्तनाचे आरोप केलेत. यानंतर गायिका सोना मोहपात्रानेही कैलाशच्या गैरवर्तनाचा पाढा वाचला. आता आणखी एका गायिकेने कैलाश खेरवर गंभीर आरोप केला आहे. या गायिकेचे नाव आहे, वर्षा सिंग धनोवा. वर्षा सिंग धनोवा हिने यु ट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने कैलाश खेर आणि म्युझिक डायरेक्टर तोशी साबरीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. ‘मी कैलाश खेरला गुरु मानायचे. दुबईतून परततांना मला कैलाश खेर भेटला. माझा गुरु माझ्यासमोर उभा आहे, हे पाहून मला प्रचंड आनंद झाला. मी त्यांच्यासोबत फोटोही घेतला. पण या पहिल्याच भेटीत कैलाश खेरने माझा मोबाईल नंबर मागितला आणि विमानातचं त्याने माझ्याशी चॅटींग सुरू केले. यानंतर मुंबईत परतल्यावर एकदिवस त्याचा कॉल आला. मला भेट, मला तुझ्यावर प्रेम करायचे आहे, असे थेटपणे तो मला म्हणाला, ’असे वर्षा या व्हिडिओत सांगतेय. 

(साभार) 

यानंतर वर्षाने तोशी साबरीवरही गंभीर आरोप ठेवला आहे. तोशीमुळे माझे करिअर संपले. त्याच्या त्या दिवशीच्या व्यवहाराने इंडस्ट्रीबद्दल माझ्या मनात इतकी भीती निर्माण झाली की, माझे करिअर सोडून मुंबईतून परतले, असे तिने म्हटले आहे.  ‘मी एका गाण्यासाठी स्वत:हून तोशीशी संपर्क साधला होता. त्याने मला एक नवे गाणे देण्याचे आश्वासन देत मला बोलवले़ गाडीत बसवल्यावर तो ड्रिंक करू लागला आणि त्याने माझ्याशी लगट सुरू केले. यानंतर तो मला त्याच्या स्टुडिओत घेऊन गेला आणि तिने पुन्हा माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण मी दाद देत नाही म्हटल्यावर तो मागे हटला आणि मी तिथून निघाले,’ अशी आपबीती तिने सांगितली आहे.तोशीच्या या व्यवहारानंतर कुण्याही म्युझिक डायरेक्टरला भेटण्याची माझी हिंमत झाली नाही आणि मी डिप्रेशनमध्ये गेले, असेही तिने सांगितले आहे.

टॅग्स :कैलाश खेरमीटू