Join us  

यंदा Met Gala 2024 मध्ये 'रेड' नाही तर 'ग्रीन कार्पेट'चा वापर! जाणून घ्या का केला मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 1:15 PM

यंदा मेट गालाने रेड कार्पेटला रिप्लेस केलं.

न्युयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये नुकताच Met Gala २०२४  हा सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये हॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोहळा होताच सोशल मिडियावर या सोहळ्यातील आश्चर्यकारक गोष्टींची चर्चा जबरदस्त व्हायरल होत आहे. यामध्ये यावर्षी सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे  Met Gala 2024 मधील 'ग्रीन कार्पेट'ची. यंदा रेड कार्पेट ऐवजी  ग्रीन कार्पेटचा वापर का करण्यात आला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

यंदा मेट गालाने रेड कार्पेटला रिप्लेस केलं. मेट गाला 2024 ची यंदाची थीम ही 'गार्डन ऑफ टाइम : ॲन ऑड टू आर्ट अँड इटरनिटी' ही होती. ही थीम जे जी बॅलार्डच्या लघुकथेपासून प्रेरित आहे. त्यानुसार कार्पेट सजवण्यात आलं आणि रेड ऐवजी ग्रीन कार्पेटचा वापर करण्यात आला. ग्रीन आणि ऑफ व्हाइट कॉम्बिनेशन असलेल्या पायऱ्या, तर हिरवाई आणि फुलांनी सजवलेल्या भिंती सेलिब्रेशनसाठी खास ठरल्या. थीमनुसारच अतिथींनी निसर्गाच्या सौंदर्याचे सार आत्मसात करत फॅशनचा जलवा दाखवला.  

विशेष म्हणजे कॉस्ट्यूम इन्स्टिट्यूटचे नवीन प्रदर्शन 'स्लीपिंग ब्युटीज: रीवॉकिंग फॅशन'मध्ये 400 वर्षांहून अधिक काळातील फॅशन इतिहासातील प्रतिष्ठित डिझाईन्सचे प्रदर्शन करण्यात आलं. ज्यात एल्सा शियापरेली, ख्रिश्चन डायर, यवेस सेंट लॉरेंट आणि ह्यूबर्ट डी गिव्हेंची यासारख्या नामवंत डिझायनर्सच्या नावांचा समावेश आहे. आतापर्यंत असंख्य डिझाइन आणि रंगानी हे कार्पेट सजवण्यात आले आहे. यापुर्वी 2015 मध्ये चीनमध्ये मेट गालामध्ये ग्लास एडिशन पाहायला मिळालं. तर 2019 मध्ये गुलाबी रंगाचं कार्पेट मेट गालामध्ये पाहायला मिळालं.

फॅशन जगातात Met Gala सोहळा महत्त्वाचा.  दरवर्षी या इव्हेंटसाठी एक थीम ठरवून दिली जाते. या थीमनुसारच सेलिब्रिटींना त्यांचे कपडे, मेकअप, हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टी ठरवायच्या असतात. या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर त्यांची चर्चा जगभर होते. संगीत, चित्रपट, फॅशन, मॉडेलिंग या क्षेत्रातील प्रसिद्ध लोक या सोहळ्यात सहभागी होत असतात. 1946 पासून या सोहळ्याची सुरुवात झाली. 

टॅग्स :मेट गालासेलिब्रिटीहॉलिवूड