शैलेश काळे दिग्दर्शित ‘घंटा’ या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली आहे. कारण ‘घंटा’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार अमेय वाघ, आरोह वेलणकर आणि सक्षम कुलकर्णी यांचा समावेश आहे. या चित्रपटात मुंबईत स्ट्रगल करत असलेले हे तिघे जगण्यासाठी काय उद्योग करतात, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या तिघांची ही गोष्ट नक्कीच तरुणांना प्रेरणा देणारी असल्याचे दिग्दर्शक शैलेश काळेने लोकमत सीएनएक्सला सांगितले आहे, तसेच तो म्हणाला की, या चित्रपटात पाच गाणी आहेत, एक गजलदेखील आहे. ही रॉक गजल असल्याने तरुणांच्या पसंतीस नक्कीच पडणार असल्याचेदेखील त्याने या वेळी सांगितले आहे. या चित्रपटाचे लिखाण सुमित बोनकर आणि राहुल यशोद यांनी केले आहे.
‘घंटा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
By admin | Updated: October 14, 2016 05:57 IST