Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठीमध्ये मेघा धाडे, सई लोकूर आणि पुष्कर जोग मध्ये पुन्हा होणार मैत्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:37 IST

मेघा बरोबर असलेली पुष्कर - सईची मैत्री तुटते की काय असे वाटत असतानाच आज या तिघांमध्ये पुन्हा मैत्री होताना बघायला मिळणार आहे. या तिघांची मैत्री प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत होती. पण आज हे तिघे पुन्हा एकत्र येणार आहेत.

मराठीवरील बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये घरातील ट्रिओ पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. म्हणजेच सई, मेघा आणि पुष्कर यांची पुन्हा एकदा मैत्री होणार आहे. काही दिवसांपासून मेघा, सई आणि पुष्कर यांच्या मैत्रीमध्ये वादाची ठिणगी पडली होती. पुष्कर आणि मेघा एकमेकांचे ऐकून घ्यायला देखील तयार नव्हते. या घरामध्ये दर आठवड्याला नाती बदलतात. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे घरामध्ये फारच कमी मंडळी उरली आहेत, त्यामुळे जुने मित्र – मैत्रिणी यांच्याशिवाय फारकाळ हे सदस्य दूर राहू शकत नाही. कितीही भांडण, गैरसमज झाले तरी देखील ते मिटवून पुढे जाणे हे अनिवार्य असते. मेघा, सई आणि पुष्कर यांच्या मधील वाद विकोपाला गेले, त्यांच्यामध्ये बरीच भांडण झाली, मतभेद झाले, आरोप लावले गेले आणि त्यामुळे आता मेघा बरोबर असलेली पुष्कर - सईची मैत्री तुटते की काय असे वाटत असतानाच आज या तिघांमध्ये पुन्हा मैत्री होताना बघायला मिळणार आहे. या तिघांची मैत्री प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत होती. पण आज हे तिघे पुन्हा एकत्र येणार आहेत.

बिग बॉस मराठीचा हा आठवडा पुष्कर, मेघा, सई यांच्या ग्रुपसाठी थोडा तणावाचा आणि वाद विवादांचा ठरला. पुष्कर आणि सई यांनी मेघावर असलेली नाराजी  व्यक्त केली. पुष्कर, सई, रेशम, आस्ताद, नंदकिशोर हे सगळेच मेघा विरोधात आले. काल सर्व सदस्यांना एकमेकांबद्दल जे काही वाटते ते एका पत्राद्वारे लिहायचे होते. ज्यामध्ये पुष्करने देखील मेघासाठी पत्र लिहिले होते. जे आज पुष्कर सईला सांगणार आहे. आज पुष्करने सई आणि मेघा जवळ त्याच्या भावना व्यक्त केल्या. ती त्या दोघींवर प्रेम करतो. मेघाचा तो खूप रीसपेक्ट करतो जे काही मागील दिवसामध्ये झाले ते मी विसरून आता पुढे जायला तयार आहे. तुम्ही दोघी मला सोडून नका जाऊ असं म्हणत पुष्कर खूपच भावुक झाला. 

टॅग्स :बिग बॉस मराठी