Join us

सिद्धान्त उलगडणार नात्यांचे गणित!

By admin | Updated: June 3, 2015 00:21 IST

जागतिक पातळीवर मराठी सिनेमाने स्वत:ची विशेष छाप पडली आहे. सिनेमाच्या विषयातील आशयघनता आणि प्रेक्षकांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज बांधत मराठी सिनेसृष्टीने

जागतिक पातळीवर मराठी सिनेमाने स्वत:ची विशेष छाप पडली आहे. सिनेमाच्या विषयातील आशयघनता आणि प्रेक्षकांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज बांधत मराठी सिनेसृष्टीने मराठी व अमराठी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. असाच एक अनोखा विषय सिद्धान्तच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नात्यातील गणित आणि गणितामुळे बदलणारी नाती सिनेमाचा गाभा आहे. विषयाचा बोझडपणा घालवून त्यातील गंमत आणि गोडवा दिग्दर्शक विवेक वाघ यांनी उत्तमरीत्या रेखला आहे. ‘नवलखा आटर््स मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेंमेंट’चे नीलेश नवलखा आणि ‘होली बेसिल प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे विवेक कजारिया यांची दर्जेदार निर्मिती असलेल्या सिनेमांच्या यादीत सिद्धान्त या सिनेमाचे नाव दाखल होणार आहे. या दोघांसोबत यंदा ‘व्हर्च्यू एंटरटेंमेंट’चे अमित अहिरराव यांनीदेखील निर्मितीचे उत्तम गणित संभाळले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. सिद्धान्त या मराठी सिनेमाची निवड टोरांटो येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आॅफ साउथ अमेरिका तसेच न्यू यॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली आहे.