Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाला ‘मेरी कॉम’

By admin | Updated: August 30, 2014 22:43 IST

महिला बॉक्सर एमसी मेरीकॉमच्या जीवनावर आधारित असलेला प्रियंका चोप्राचा ‘मेरी कॉम’ हा चित्रपट रिलीजच्या आठवडाभरापूर्वीच महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाला आहे.

महिला बॉक्सर एमसी मेरीकॉमच्या जीवनावर आधारित असलेला प्रियंका चोप्राचा ‘मेरी कॉम’ हा चित्रपट रिलीजच्या आठवडाभरापूर्वीच महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाला आहे. याचा अर्थ आता महाराष्ट्रात हा चित्रपट पाहण्यासाठी तिकिटासाठी कमी पैसे लागतील. राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री होण्याची बातमी खुद्द प्रियंका चोप्राने टि¦टरवर दिली आहे. प्रियंकाने टि¦ट केले आहे की, ‘मेरी कॉम’ रिलीजच्या आठवडाभराआधीच महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाला आहे. ‘क्या बात है.’ हा चित्रपट येत्या 5 सप्टेंबरला रिलीज होतोय. चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. नुकताच रिलीज झालेला राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाला आहे. ‘मर्दानी’ मात्र रिलीजनंतर टॅक्स फ्री झाला आहे.