Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या अभिनेत्रींचा मोर्चा जाहिरातींकडे

By admin | Updated: October 8, 2015 05:25 IST

दूरचित्रवाहिन्यांवर ‘जाहिराती’ हा एखाद्या कलाकृतीच्या मध्यंतरामध्ये येणारा एक अविभाज्य घटक. आपल्या आवडत्या मालिका पाहण्यासाठी टीव्हीसमोर ठाण मांडून

दूरचित्रवाहिन्यांवर ‘जाहिराती’ हा एखाद्या कलाकृतीच्या मध्यंतरामध्ये येणारा एक अविभाज्य घटक. आपल्या आवडत्या मालिका पाहण्यासाठी टीव्हीसमोर ठाण मांडून बसणाऱ्यांवर सातत्याने प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीचा मारा केला जातो. त्यामुळे प्रेक्षकही या जाहिरातींना आता ‘यूझ टू’ झाले आहेत. तुम्हाला वाटत असेल, की अचानक जाहिरातींबद्दल का सांगायला सुरुवात केली आहे. तर त्यामागचा हेतू केवळ एवढाच आहे, की मराठी अभिनेत्रीदेखील जाहिरातींमध्ये झळकल्या आहेत. मराठी चित्रपटांवर स्वत:चे वर्चस्व सिद्ध करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रींनी आता आपला मोर्चा जाहिरातींकडे वळविला आहे. ‘कुहू’ म्हणजे स्पृहा जोशी, अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर, स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडीदेखील जाहिरातीत दिसत आहे. सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर आणि ‘अप्सरा आली’मधून अदाकारी दाखविलेली सोनाली कुलकर्णी, उदय टिकेकर आणि ऋषीकेश जोशीसमवेत चहापानाचा आग्रह करताना दिसत आहे. हे पाहता जाहिरातींमधूनदेखील आपला अपिअरन्स दाखविण्याचा प्रयत्न ही कलाकार मंडळी करीत आहेत. त्यांच्या प्रसिद्धीचा प्रॉडक्टलाही फायदा होतो आहे, हे नक्की!