Join us

मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे अद्याप आहे सिंगल, लग्नाबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:35 IST

Mukta Barve: मुक्ता बर्वेला अनेकजण सतत लग्नाबद्दल विचारणा करत असतात. नुकतेच तिने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. लवकरच अभिनेत्री वाय (Y Movie) या चित्रपटात झळकणार आहे. ‘वाय’ हा चित्रपट येत्या २४ जूनला रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठीतील पहिला हायपरलिंक चित्रपट हा एका महत्त्वाच्या विषयावर आधारित चित्रपट असणार आहे. नुकतेच मुक्ता बर्वे हिने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

मुक्ता बर्वेला अनेकजण सतत लग्नाबद्दल विचारणा करत असतात. यावर ती म्हणाली की, मी अशा प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. मला असं वाटतं की हा खूप वैयक्तिक निर्णय आहे. एखाद्या स्त्रीने लग्न करावे की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. याविषयी कोणीही कोणाला विचरणे मला योग्य वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला फक्त ती अभिनेत्री आहे म्हणून किंवा तुम्हाला माहित आहे म्हणून विचारणं बरोबर नाही. केवळ कलाकार आहोत म्हणून तुमच्या मर्यादा सोडून एखाद्या व्यक्तीला असा खाजगी प्रश्न विचारणे मला वाह्यात वाटते. पण प्रत्येकाची शाळा घेणे काही शक्य नसते त्यामुळे मी सोडून देते त्याचा फार विचार करत नाही.

मुक्ता बर्वे हिने अनेकदा लग्नाच्या बाबतीत हे स्पष्ट केले आहे की तिला लग्न ही गरज वाटत नाही. ती आता आनंदी आहे आणि याहून जास्त जर तिचे सुख आणि आनंद वाढणार असेल तरच ती लग्न करेल.

टॅग्स :मुक्ता बर्वे