Join us
Daily Top 2Weekly Top 5

चोर पावलांनी अनिरुद्ध शिरणार अरुंधतीच्या घरात; नेमका काय असेल त्याचा उद्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:14 IST

Aai kuthe kay karte: एकीकडे अरुंधती तिच्या पायावर सक्षमपणे उभी राहिली आहे. तर, दुसरीकडे तिचं यश पाहून अनिरुद्ध आणि संजना यांचा जळफळाट होत आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अरुंधतीच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत. देशमुखांचं घर सोडल्यानंतर अरुंधतीने तिच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अलिकडेच तिने हक्काचं

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या आई कुठे काय करते या मालिकेत अनेक रंजकदार वळण येत आहेत. एकीकडे अरुंधती तिच्या पायावर सक्षमपणे उभी राहिली आहे. तर, दुसरीकडे तिचं यश पाहून अनिरुद्ध आणि संजना यांचा जळफळाट होत आहे. यामध्येच आता मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. अनिरुद्ध रात्रीच्या वेळी चक्क अरुंधतीच्या घरात चोर पावलाने शिरणार आहे.

सध्या या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये रात्रीच्या वेळी अरुंधती झोपलेली असताना अनिरुद्ध चोर पावलाने तिच्या घरात शिरकाव करतो. यावेळी घरात कोणी तरी आल्याचा भास झाल्यामुळे अरुंधती यशला फोन करुन बोलावते. विशेष म्हणजे यश आल्यानंतर तो घरात शिरलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. यावेळी घरात शिरलेला व्यक्ती कोणी चोर नसून चक्क अनिरुद्ध असल्याचं त्यांना समजतं. 

दरम्यान, अरुंधतीच्या घरात अनिरुद्धला या पद्धतीने आलेलं पाहून यश आणि अरु दोघंही थक्क होतात. परंतु, अनिरुद्ध अशा पद्धतीने का आला? त्याचा उद्देश काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार