Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मंगळसूत्राच्या दोन वाट्या...', एकदा ऐकाच स्वानंदी टिकेकरचा भन्नाट उखाणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 16:47 IST

सध्या स्वानंदीच्या उखाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मराठी मनोरंजनविश्वासातील अनेक कलाकरांनी लग्नगाठ बांधली. नुकतेच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेवर व इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी लग्नबंधनात अडकले आहेत. स्वानंदी व आशिषच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या स्वानंदीच्या उखाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या उखाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.  

‘इट्स मज्जा’ या इन्स्टाग्राम पेजवर स्वानंदीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासर-माहेरची खून, आशिषचं नाव घेते, कुलकर्णींची सून, असा स्वानंदीने लग्नासाठी खास उखाणा घेतला आहे. यावेळी आशिष -स्वानंदनी पारंपारिक लूकमध्ये दिसले.  स्वानंदनीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर लाल रंगाची शाल घेतली होती. तसेच आशिषने स्वानंदच्या साडीला मॅचिंग अशी ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघं खूप सुंदर दिसते होते.

 स्वानंदी ही अभिनेता उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. स्वानंदीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  तर स्वानंदीचा पती अर्थात आशिष कुलकर्णी हा एक उत्तम गायक आहे. आशिषने 'इंडियन आयडॉल 12' गाजवलं आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने गाणी गायली आहेत.  आशिष आणि स्वानंदीच्या लग्नाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत चाहत्यांनी त्यांना भावी आयु्ष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

टॅग्स :स्वानंदी टिकेकरसेलिब्रिटीमराठी अभिनेता