Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कलाकारसुद्धा चुकीचं वागतात म्हणून...; मानधनाच्या थकबाकीबद्दल मराठी अभिनेत्रीचं परखड मत

By सुजित शिर्के | Updated: April 1, 2025 16:25 IST

गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत.

Sayli Salunkhe: गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी मालिकाविश्वात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमधून हे मराठमोळे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अभिनेत्री किशोरी शहाणे, निशिगंधा वाड तसेच अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख अशा बऱ्याच मराठी कलाकारांनी हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या यादीत आणखी एक नाव सामील झालं आहे,ही अभिनेत्री म्हणजे सायली साळूंखे (Sayli Salunkhe). 'छत्रीवाली', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सायली साळुंखे हिंदी कलाविश्वातही तितकीच सक्रिय असल्याची पाहायला मिळतेय.

नुकताच सायली साळुंखेने 'लोकमत फिल्मी'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, अभिनेत्रीला एक एक प्रश्न विचारण्यात आला.सध्या कलाकारांचं मानधन वेळेवर दिलं जात नाही. थकवलं जातं असे अनेक प्रकार समोर येत आहेत. तुला असा काही अनुभव आलाय का?  त्यावेळी सायली साळुंखे म्हणाली," देवाच्या कृपेने माझ्या बाबतीत असं कधी घडलं नाही. आतापर्यंत मी अनेक शो केले आहेत, मी मराठीतही काम केलंय या प्रवासात मला असा कधी अनुभव आलेला नाही. मला प्रत्येक शोमध्ये ६०-९० दिवसांच्या आधीच मानधन मिळालं आहे. नशीबाने मला चांगली लोकं मिळाली.पण, कधी-कधी असं होतं की कलाकार सुद्धा चुकीचं वागतात. त्यांचा एक अहंकार असतो. तसंच सेटवरील वातावरण या गोष्टी पाहिल्या तर त्यांच्या काही मतभेदांमुळे या गोष्टी होऊ शकतात."

यानंतर पुढे सायलीने सांगितलं,"मी असंही म्हणणार नाही निर्मात्यांची चूक नसते.असंही घडलंय की त्यांच्याकडे कलाकारांना पैसेच द्यायला नसतात. त्याचबरोबर  काही कलाकार त्यांच्या कॅरेक्टरमध्ये वाहत जातात. त्यांना असं वाटतं की आमच्यामुळे शो चालणार नाही आमच्याशिवाय काहीच घडू शकत नाही. या गोष्टी फार वेगळ्या आहेत. मी ठाम याबद्दल काहीच सांगू शकत नाही."

वर्कफ्रंट 

सायली साळुंखेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'मेहंदी है रचनेवाली', 'पुकार','दिल से दिल तक', 'बातें कुछ अन कहीं सी' यांसारख्या ती मालिकांमध्ये झळकली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी