Join us  

मराठीतील सुप्रसिद्ध गायकाने घरी आणली नवी कोरी मर्सिडीज कार, किंमत वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:12 AM

मराठी गायकाने खरेदी केली मर्सिडीज बेंझ, शेअर केला व्हिडिओ

आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे मराठीतील सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सध्या चर्चेत आहेत. आवाजाची देणगी लाभलेल्या आणि घरातूनच गायनाचं बाळकडू मिळालेल्या राहुल देशपांडे यांनी आजवर अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकतीच त्यांनी नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ राहुल देशपांडेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

राहुल देशपांडेंनी महागड्या गाड्यांपैकी एक असलेली नवी कोरी मर्सिडीज बेंन्झ घरी आणली आहे. इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर करत ही बातमी त्यांनी चाहत्यांना दिली आहे. या व्हिडिओला त्यांनी “आईबापू तुम्ही नेहमीच आमच्याबरोबर होतात. मी जे काही आहे, ते तुमच्यामुळे आहे. त्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर आहेत. बापू तुमच्या स्कूटरवरुन तुम्ही मला संगीताच्या क्लाससाठी घेऊन जायचा. बापू आई, आपल्यापेक्षा वडिलधाऱ्या माणसांचा आदर करण्याची शिकवण तुम्ही दिली. आज मला खूप गर्व होत आहे. संपूर्ण जग मला तुमच्या पायापाशी आणून ठेवायचं आहे,” असं कॅप्शन दिलं आहे.

राहुल देशपांडेंनी खरेदी केलेल्या मर्सिडीजची किंमत लाखोंच्या घरात आहे. त्यांनी खरेदी केलेली मर्सिडीज ही तब्बल ४५ लाख इतकी आहे. या पोस्टवर चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारांनीही कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.  

टॅग्स :राहुल देशपांडेमराठी चित्रपटमर्सिडीज बेन्झ