Join us  

'पांडू'च्या टीमकडून कोरोना नियमांची पायमल्ली; कलाकारांसह आयोजकांवर होणार गुन्हा दाखल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 3:54 PM

Pandu: 'पांडू' चित्रपटातील कलाकारांनी कोविड नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यामध्येच प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना भैय्यासाहेब यांनी पोलिस ठाण्यातील निवेदनाविषयी सांगितलं.

अभिनेता भाऊ कदम (bhau kadam) आणि सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni)  यांची मुख्य भूमिका असलेला 'पांडू' (pandu) हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील कलाकारांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आरपीआय एकतावादीचे युवाध्यक्ष भैय्यासाहेब इंदिसे यांनी चित्रपटातील कलाकार व आयोजकांविरोधात निवेदन दिलं आहे. भैय्यासाहेब इंदिसे यांनी ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्यात हे निवेदन दिलं आहे.

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये पांडू चित्रपटाचा पहिला शो पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांना विवियाना मॉलमध्ये आनंदोत्सल साजरा केला. मात्र, यावेळी कलाकारांनी मास्क परिधान न करता. तसंच सुरक्षित अंतर न ठेवता ढोलताशाच्या गजरात डान्स केला. विशेष म्हणजे यावेळी सर्व कलाकारांना कोरोना नियमांचा विसर पडला होता. त्यामुळेच कोविड नियमांची पायमल्ली केल्याचं म्हणत भैय्यासाहेब इंदिसे यांनी पोलिस ठाण्यात निवेदन दिलं आहे. तसंच सर्व सामान्यांकडून नियमांचं उल्लंघन झाल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जातो. मग सेलिब्रिटींकडून का नाही? सेलिब्रिटींसाठी वेगळा नियम का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाचं संकट कमी होत असतांनाच आता ओमयक्रोनचं नवं संकट येऊन उभं ठाकलं आहे. त्यामुळे या काळात पुन्हा एकदा नागरिकांना सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र, अशामध्येच 'पांडू' चित्रपटातील कलाकारांनी कोविड नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यामध्येच प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना भैय्यासाहेब यांनी पोलिस ठाण्यातील निवेदनाविषयी सांगितलं.

ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्ये शुक्रवारी 'पांडू' या सिनेमाचा पहिला शो झाला. या वेळी भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, उदय सबनीस, सविता मालपेकर, प्राजक्ता माळी, कुशल बद्रिके, विजू माने यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकाही सेलिब्रिटीने मास्क परिधान केला नव्हता. तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नाही. विशेष म्हणजे, मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन लस घेणे सक्तीचे असताना एकाच्याही लसीकरणाच्या प्रमाणपत्राची पाहणी करण्यात आली नाही, असा दावा इंदिसे यांनी केला आहे.सोबतच त्यांनी पोलिस ठाण्यात निवेदन देत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीसोनाली कुलकर्णीभाऊ कदमकुशल बद्रिके