Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्याचे प्री-वेडिंग फोटो शूट पाहून तुम्हाला बॉलिवूड सिनेमांची आठवण येईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 11:02 IST

सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु आहे. मात्र सेलिब्रिटी मंडळींमध्ये सध्या जरा जास्तच लगीनघाई आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. चित्रपटसृष्टीतील ...

सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु आहे. मात्र सेलिब्रिटी मंडळींमध्ये सध्या जरा जास्तच लगीनघाई आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकले आहेत.प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर , सागरिका घाटगे अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार रेशीमगाठीत अडकले आहेत. आता या यादीत आणखी एक मराठमोळ्या कलाकाराचं नाव सामील होत झाले आहे. 'रेगे', 'घंटा' अशा सिनेमातून रसिकांची मने जिंकणारा अभिनेता आरोह वेलणकर ही लग्न बंधनात अडकला आहे. मूळचा पुण्याचा असणा-या आरोहचं त्याची मैत्रिण अंकिता शिंगवी हिच्यासह शुभमंगल पार पडले.अंकिताही पुण्याची असून तिचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी संबंध नाही.महाबळेश्वरमध्ये आरोह आणि अंकिताने डेस्टिनेशन वेडिंग केले आहे. आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे आरोहने ठरवले होते. सध्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे.आपल्या जोडीदारासह काही खास क्षण कॅमे-यात कैद करुन प्री-वेडिंग फोटो शूट केलं जाते.आरोहनेसुद्धा आपल्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.या फोटोशूटचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोशूटसाठी त्याने बॉलिवूडच्या विविध गाजलेल्या सिनेमांच्या सेटचा वापर केला आहे.'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' यासारख्या विविध सिनेमांच्या सेटवर आरोह आणि अंकिताचे प्री-वेडिंग फोटोशूट झाले आहे.या फोटोत आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असताना आरोहने प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचेही आभार मानले आहेत.प्री-वेडिंग फोटोशूटसाठी हे सेट उपलब्ध करुन दिल्याबद्दल आरोहने त्यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.त्याच्या प्री-वेडिंग फोटोशूट अल्बमला सोशल मीडियावर रसिकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्याचे चाहते,मित्र परिवार,नातेवाईक यांच्याकडून या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु आहे.आरोह अभिनेता असण्यासोबतच इंजीनिअरसुद्धा आहे.त्यामुळेच आपल्या लग्नासाठी त्याने खास मोबाईल अॅपही तयार केले होते.आरोह वेड्स अंकिता या अॅपद्वारे लग्नात घडणा-या प्रत्येक गोष्टीचे अपडेट निमंत्रितांना कळणार होते. त्यामुळे आपल्या जीवनातील हा सुंदर आणि खास सोहळा आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी आरोह कोणतीही कसर सोडत नाही असं म्हटल्यास वावगं ठरु नये.(SEE PICS:प्री-वेडिंग फोटो शूटमधील अधिक फोटो पाहण्यासाठी क्लिक करा)