कुस्तीला मिळाले फिल्मफेअरचे नामांकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 14:42 IST
मराठी चित्रपट हा आता सातासमुद्रापार पोहचला आहे. सगळीकडेच आपल्या मराठी चित्रपटांनी ठसा उमटविला आहे. आता बॉलिवूडच्या नामांकित समजल्या जाणाºया फिल्मफेअर या पुरस्कार सोहळायतही मराठी चित्रपटाला स्थान मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागातील विद्यार्थ्याच्या मातीतील कुस्ती या लघुपटास फिल्म फेअर पुरस्काराचे नामांकन प्राप्त झाले आहे
कुस्तीला मिळाले फिल्मफेअरचे नामांकन
मराठी चित्रपट हा आता सातासमुद्रापार पोहचला आहे. सगळीकडेच आपल्या मराठी चित्रपटांनी ठसा उमटविला आहे. आता बॉलिवूडच्या नामांकित समजल्या जाणाºया फिल्मफेअर या पुरस्कार सोहळायतही मराठी चित्रपटाला स्थान मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागातील विद्यार्थ्याच्या मातीतील कुस्ती या लघुपटास फिल्म फेअर पुरस्काराचे नामांकन प्राप्त झाले आहे. प्रांतिक देशमुख या विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाअंतर्गत विभागात सादर केलेली ही कलाकृती असून मराठी भाषेतून निवड झालेला हा एकमेव लघुपट आहे. शैक्षणिक वषार्तील म्हणजेच २०१५-१६ च्या चौथ्या सत्रात विभागाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाअंतर्गत या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी विभागाने आखून दिलेल्या स्थळ-वेळेच्या कठोर मयार्दा पाळून अवघ्या चौदा ते सोळा तासांच्या चित्रणामधून तयार झालेला हा लघुपट आहे. राजे-महाराजांच्या काळापासून चालत आलेला मातीतला कुस्ती हा प्रकार कशाप्रकारे लोप पावत चालला आहे व त्याचे जतन होणे किती महत्त्वाचे आहे हे या लघुपटाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. याबाबत बोलताना दिग्दर्शक प्रांतिक सांगतो, सध्याच्या काळात पंजाब व हरियाणा वगळता देशभरातील पारंपारिक कुस्तीची अवस्था खुपच बिकट झाली आहे. कारण मातीतल्या कुस्तीपेक्षा मॅट रेसलिंगला जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राचीन काळापासून चालत आलेला हा कुस्तीप्रकार जपण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हेच या लघुपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. या लघुपटाला स्पर्धेत विजेते ठरवण्यासाठी फिल्म फेअर शॉर्ट फिल्म अॅवॉर्डच्या संकेतस्थळावर जाऊन आपण आपले मत नक्की नोंदवा असे आव्हान देखील त्याने प्रेक्षकांना केले आहे. आता फिल्मफेअर पुरस्कार सोहळ््यात कुस्ती हा लघुपट मोहोर उमटविणार का हे तर आपल्याला लवकरच समजेल.