Join us

उमेश कामत का म्हणतोय स्वतःला लकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 14:46 IST

अभिनेता उमेश कामत दिग्दर्शक संजय जाधवच्या आगामी 'लकी' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे'लकी' चित्रपट डिसेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता उमेश कामतने मराठी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याने शेवटचे 'येरे येरे पैसा' चित्रपटात काम केले होते आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील उमेशची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. त्यानंतर आता तो दिग्दर्शक संजय जाधवच्या आगामी 'लकी' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निर्माता-दिग्दर्शक संजय जाधवसाठी अभिनेता उमेश जाधव लकी ठरतो हे ऐकून तुम्हाला नेमके काय झाले असेल असा प्रश्न पडला असेल ना. याबाबत खुद्द उमेशनेच सांगितले आहे. 

उमेश म्हणाला की, 'किती दिवस संजय जाधव हे अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशीसोबत काम करणार, त्यांना ना फ्रेश चेहरा पाहिजे….अगदी माझ्यासारखा…म्हणजेच उमेश कामत…इंडस्ट्रीत माझ्यासारखा लकी दुसरा कोणीच नाही आहे…रुपारेल सारखे कॉलेज…आभाळमायासारखी पहिली मालिका..नाटक-सिनेमे तर सुरू आहेतच..प्रियासारखी बायको आणि महत्त्वाचे म्हणजे येरे येरे पैसा या सिनेमासाठी नुकताच मिळालेला विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार…म्हणूनच लकी मीच आहे…माझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही आणि महत्त्वाचे म्हणजे ही लकी होण्याची माझी परंपरा संजय जाधव यांच्या लकीमुळे कायम राहणार आहे…सवाल'

उमेश कामतने ट्विटरवर केलेल्या ह्या व्हिडिओला खूप चांगली पसंती मिळते आहे. 'लकी' या चित्रपटात उमेश मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :उमेश कामतसंजय जाधव