शिवानीला का राहायचय पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 12:42 IST
डबलसीट, फुंतरु आणि अॅन्ड जरा हटके अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारलेली अभिनेत्री शिवानी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत ...
शिवानीला का राहायचय पॉझिटिव्ह
डबलसीट, फुंतरु आणि अॅन्ड जरा हटके अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारलेली अभिनेत्री शिवानी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शिवानीने नाटक, मालिका अन चित्रपटांमध्ये नेहमीच तिच्या उत्तम अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तर आता शिवानी म्हणतेय मला पॉझिटिव्ह रहायचय आपल्या आजुबाजूला जर सकारात्मक लेक असतील, आपल्या डोक्यात सतत चांगले आणि पॉझिटिव्ह विचार असतील तर नक्कीच दिवस छान जातो. आता आपली ही मराठमोळी अभिनेत्री देखील सकारात्मक राहण्याचा विचार करतेय. ती असे का बोलतेय ते जाणुन घेऊयात. शिवानी सकारात्मक राहण्याचा नवीन वर्षाचा संकल्प करतेय. शिवानी सांगतेय, ''नवीन वषार्चं माझं रिजोल्युशन पॉझिटिव्ह राहणं आणि हीच पॉझिटिव्हिटी इतरांनाही देणं हे आहे. आपण खूप कामात असतो, त्या कामाचा बºयाचदा भरपूर स्ट्रेस आपल्यावर येतो आणि बºयाचदा आपल्याला तणाव येतोय याच गोष्टीकडे आणि पयार्याने स्वत:कडे आपलं दुर्लक्ष होतं. त्याचा परिणाम आपल्या स्वत:च्या मनावर, शरीरावर, नातेसंबंधावर पडतो. त्यामुळे येत्या वर्षात स्वत:च्या मनाची, शरीराची नीट काळजी घेऊन, शक्य तितकं पॉझिटिव्ह स्वत:ला ठेवणे आणि हीच पॉझिटिव्हिटी इतरांनाही देणं हा माझा नवीन वषार्चा संकल्प आहे. माझं मन आणि शरीर जर हेल्दी असेल, तर मी उत्तम काम करू शकेन आणि उत्तम नाती जोडू शकेन. त्यासाठी चांगली पुस्तकं सतत वाचणं, उत्तम फिल्म्स बघणं, चांगल्या लोकांमध्ये रमणं, जमेल तश्या १-२ नवीन गोष्टी शिकणं हे सर्व मी करणार आहे. हीच पॉझिटिव्हिटी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात येवो आणि ह्या वर्षात आपणा सर्वांच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडो, हीच माझी सदिच्छा. आता शिवानीचा हा नवीन वर्षाचा संकल्प नक्की या वर्षात पुर्ण होवो अशीच प्रार्थना तिचे चाहते करत असतील. तसेच शिवानीला नवीन वर्षात मोठ्या पडदयावर देखील प्रेक्षकांना नक्कीच पाहायला आवडेल.