Join us

मृण्मयी देशपांडे का आहे आनंदित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 13:03 IST

 प्रत्येक व्यक्तीला आपल्या लाइफ पार्टनरसोबत कुठे तरी लांब फिरण्यास जाण्याची इच्छा असते. तसेच त्याच्यासोबतची ही एन्जॉय ट्रीप अविस्मरणीय राहावी ...

 प्रत्येक व्यक्तीला आपल्या लाइफ पार्टनरसोबत कुठे तरी लांब फिरण्यास जाण्याची इच्छा असते. तसेच त्याच्यासोबतची ही एन्जॉय ट्रीप अविस्मरणीय राहावी असे प्रत्येकाला वाटत असते. अशीच एक ट्रीप प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्यासाठी अविस्मरणीय बनली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मृण्मयी ही नुकतीच स्वप्नील राव याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. ती लग्नानंतर पहिल्यांदाच स्वप्नीलसोबत सुंदर क्षण कैद करण्यात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण तिने नुकतेच फेसबुकवर स्वप्नीलसोबत ट्रीपचा आनंद घेत असल्याचे काही झक्कास फोटो अपलोड केले आहेत. तसेच या फोटोमध्ये ती पॅराग्लाडिग करतानादेखील दिसत आहे. तिचे हे फोटो पाहता ती आज है उपर, आँसमा नीचे अशाच काही हॅपी मूडमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोला प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच त्यांच्या या फोटोला रब ने बना दी जोडी, अशीच आनंदी राहा अशा अनेक कमेंन्ट पाहायला मिळत आहे. मृण्मयीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. ती कुंकू या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. तसेच तिची अग्निहोत्र ही मालिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याचप्रमाणे तिने अनुराग, नटसम्राट, कटयार काळजात घुसली , मामाच्या गावाला जाऊ या, आंधळी कोशिंबीर, पुणे व्हिया बिहार, साट लोट पण सगळ खोट असे अनेक सुपरहीट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत.