प्रार्थना बेहरे का करत नाही नवीन वर्षाचा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 14:41 IST
प्रत्येकजण लहानपणापासून नवीन वर्षाचा संकल्प करत असतात. कारण नवीन वर्षाचा संकल्प करून ते ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न शालेय जीवनात ...
प्रार्थना बेहरे का करत नाही नवीन वर्षाचा संकल्प
प्रत्येकजण लहानपणापासून नवीन वर्षाचा संकल्प करत असतात. कारण नवीन वर्षाचा संकल्प करून ते ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न शालेय जीवनात शिकविले जातात. त्यामुळे काहीजण हा संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी होतात. मात्र काहीजण संकल्प करतात मात्र त्यांच्याकडून ते पूर्णच होत नसल्यामुळे ते संकल्पच करत नाही. अशाच संकल्प न करणाºयामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेचादेखील समावेश आहे. प्रार्थना सांगते, मी कधीच नवीन वर्षाचा संकल्प करत नाही. कारण आपण आपल्या नवीन संकल्पाबद्दल सुरुवातीला खूप उत्साही असतो. मात्र जसजसा काळ पुढे जातो तसतसा आपला उत्साह ही कमी होत जातो आणि पयार्याने त्या संकल्पाचे काहीच होत नाही. पण मी मात्र एक गोष्ट नित्यनियमाने पाळते ती म्हणजे नवीन वर्षात काय करायचे आणि काय नाही करायचे. या सर्व गोष्टींकडे माझा पूर्णपणे फोकस असतो. आणि त्यांनंतर वर्षाच्या शेवटच्या दिवसात या सर्व गोष्टींचा रिझल्ट लावते. मी केलेला संकल्प पूर्ण केला की नाही. प्रार्थना बेहरे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने कॉफी आणि बरचं काही, मितवा, मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी, रिटा असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत. तसेच तिने बॉडीगार्ड आणि नुकताच प्रदर्शित झालेला वजह तुम हो या बॉलिवुड चित्रपटातदेखील पाहायला मिळाली. आता तिचा फुगे हा आगामी चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत स्वप्नाली जोशी, सुबोध भावे हे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहे.या चित्रपटाविषयी प्रेक्षकदेखील उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.