Join us

का म्हणतायेत गश्मिर आणि स्पृहा 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 14:29 IST

मला काहीच प्रॉब्लेम नाही... अचानक हे असं वाक्य एखाद्याच्या तोंडून ऐकणं हेच किती  प्रॉब्लेमेटीक असतं नाही? हाच  प्रॉब्लेम  काही ...

मला काहीच प्रॉब्लेम नाही... अचानक हे असं वाक्य एखाद्याच्या तोंडून ऐकणं हेच किती  प्रॉब्लेमेटीक असतं नाही? हाच  प्रॉब्लेम  काही दिवसांपूर्वी गश्मीर आणि स्पृहाच्या चाहत्यांनी अनुभवला जेव्हा या जोडीने सोशल मिडियावर मला काहीच प्रॉब्लेम  नाही असं म्हटलं... हे असं म्हणणाऱ्या आपल्या लाडक्या कलाकाराच्या आयुष्यात खरंच काही प्रॉब्लेम नाही की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स लपवण्यासाठीचा हा अट्टहास केला जातोय? या कोड्यात अडकलेल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आले आहे गश्मीर – स्पृहाच्या नव्या चित्रपटाचं नवं कोरं टीझर पोस्टर... फिल्मी किडा निर्मित या चित्रपटाच्या पोस्टरवर मला काहीच प्रॉब्लेम नाही असा आव ही जोडी आणते आहे.मात्र हे म्हणण्या इतपत कोणता प्रॉब्लेम या जोडीच्या आयुष्यात झाला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटासाठी गश्मीर महाजनी– स्पृहा जोशी ही आगळी – वेगळी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.समीर विद्वांस यांनी या युगाचा प्रॉब्लेम दिग्दर्शित केला असून पी. एस छतवाल, रीचा सिन्हा आणि रवी सिंह ह्यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील इतर कलाकार आणि त्यांचे प्रॉब्लेम्स लवकरच आपल्यासमोर येतील. हे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स सोडवतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अभिनयासोबतच गश्मिर महाजनी एक उत्तम नृत्य दिग्दर्शकही आहे.गेली 15 वर्षं तो नृत्य शिकवत असून त्याची स्वत:ची  डान्स अॅकेडमीही आहे.गश्मिरला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे.तसेच गश्मिरच्या डान्स अकॅडमीमध्ये शास्त्रीय नृत्यापासून ते सालसा आणि झुंबापर्यंत अनेक नृत्यप्रकार माझ्या अॅकेडमीत शिकवले जातात. तीन वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी या डान्स अॅकेडमीमध्ये शिकायला येतात.