Join us  

'ट्रेडिशनल गोष्टीत कुठे रोमान्स घुसडवता राव?'; मुग्धासोबतच्या फोटोला ट्रोल करणाऱ्याला प्रथमेशचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:44 PM

Prathamesh Laghate: प्रथमेशने पहिल्यांदाच ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे (prathamesh laghate) आणि मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan) . आपल्या आवाजाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण करणारी ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच मुग्धा-प्रथमेशने जाहीरपणे त्यांच्या प्रेमाची कुबली दिली. त्यानंतर आता या जोडीच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रथमेश आणि मुग्धाच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर नुकतंच त्यांचं व्याहीभोजनही झालं. या व्याहीभोजनाचे काही फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, या फोटोमध्ये प्रथमेशने दिलेल्या पोझमुळे एका ट्रोलरने त्याला ट्रोल केलं. विशेष म्हणजे यावेळी प्रथमेशने सुद्धा या ट्रोलरची चांगलीच फिरकी घेत त्याला उत्तर दिलं.मस्त फोटो आहे. फक्त प्रथमेशला सांग पुढच्यावेळी रोमॅण्टिक असल्यासारखा दिस. कारण तो सत्यनारायणाच्या पूजेला आलेल्या भटजीसारखा उभा राहू नको. बाकी खूप छान, अशी कमेंट एका युजरने केली.  त्याची ही कमेंट पाहून प्रथमेशनेही त्याला उत्तरं दिलं आहे.

काय म्हणाला प्रथमेश?

"अण्णा, व्याही भोजन ही आपली परंपरा आहे. ट्रेडिशनल गोष्टीत कुठे रोमान्स घुसडवता राव? एवढं कन्फ्युजन," असा रिप्लाय प्रथमेशने दिला. त्याच्या या रिप्लायवर अनेकांनी त्याला सपोर्टही केला आहे.

दरम्यान, प्रथमेश आणि मुग्धा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरी लग्नाची गडबड सुरु झाली आहे. नुकताच मुग्धाच्या मोठ्या बहिणीचा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यानंतर मुग्धाही नववधूच्या रुपात चाहत्यांसमोर येणार आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीसा रे ग म प