मानसी चालली कुठे परीचा ड्रेस घालून ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 15:25 IST
प्रत्येकाचा फोटो काढणे हा जिव्हाळ््याचा विषय आहे. त्यात एखादया दिवशी एखादा कार्यक्रम, पार्टी, इव्हेन्ट, लग्न असे काही कार्यक्रम असले ...
मानसी चालली कुठे परीचा ड्रेस घालून ?
प्रत्येकाचा फोटो काढणे हा जिव्हाळ््याचा विषय आहे. त्यात एखादया दिवशी एखादा कार्यक्रम, पार्टी, इव्हेन्ट, लग्न असे काही कार्यक्रम असले की, आपण एकदम हटके लूकमध्ये दिसण्याचा प्रयत्न करत असतो. जर हा लूक झक्कास असला की, फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरणार नाही. असाच मोह अभिनेत्री मानसी नाईक हिलादेखील आवरला नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मानसीने नुकताच एक सुंदर फोटो सोशलमीडियावर अपडेट केला आहे. या फोटोमध्ये ती एकदम परीच्या लूकमध्ये अवतरली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिने लगती हू कुछ जिद्दी सी, करती हू मनमानी, फुलो सी कोमल, तितली सी चंचल, तूम ही कह दो एक नाम तुम्हारा, ओ.. परियों की रानी असे पोस्टदेखील केले आहे. अशा या मराठी चित्रपटसृष्ट्रीच्या सुंदर परीच्या फोटोला लाइक्सदेखील भरपूर मिळाले आहेत. तसेच तिच्या चाहत्यांनी कडक, लाखों मे एक अशा सुंदर कमेंन्टदेखील सोशलमीडियावर दिल्या आहेत. त्यामुळे सध्या तर सोशलमीडियावर मराठी चित्रपटसृष्ट्रीची सुंदरी परी अवतरली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. मानसीने नेहमीच आपल्या अभिनयाने, नृत्यांने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच तिने हुतुतु, कोकणस्थ, टारगेट असे अनेक चित्रपट केले आहेत. त्याचप्रमाणे तिने अनेक डान्स रियालिटी शोमध्ये देखील आपल्या नृत्याचा जलवा दाखविला आहे. बघतोय रिक्षावाला हे गाण्याने तर प्रेक्षकांच्या मनावक आधिराज्य गाजविले आहे. तर बाई वाडयावर या गाण्याने तर सध्या खूपच धूमाकूळ घातलेला दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.