Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री रेणुका शहाणेच्या फोटोमागचं गुपित काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 17:03 IST

आपला अभिनय आणि कुणालाही घायाळ करेल असं चेह-यावरील स्मित हास्य यामुळे मराठीसह हिंदी रसिकांवर जादू करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ...

आपला अभिनय आणि कुणालाही घायाळ करेल असं चेह-यावरील स्मित हास्य यामुळे मराठीसह हिंदी रसिकांवर जादू करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. हम आपके हैं कौन या सिनेमातील तिनं साकारलेली भूमिका रसिकांना प्रचंड भावली. या सिनेमातील तिचं हास्य, अभिनय याची रसिकांवर जादू झाली होती. हम आपके हैं कौन सिनेमात रेणुकाने साकारलेल्या व्यक्तीरेखेचा मृत्यू होतो तेव्हा थिएटरमध्येही अनेकांना अश्रू अनावर झाले होते. ही रेणुकाच्या अभिनयातील जादू होती. सुरभी या छोट्या पडद्यावरील शोमधूनही तिने रसिकांची मने जिंकली होती. प्रत्यक्ष जीवनातही कायमच चिरतरुण वाटणा-या रेणुका शहाणे यांचा एक फोटो समोर आला आहे. व्हायरल झालेला फोटो पाहुन अनेकजण संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळत आहे.हा फोटो रेणुका शहाणे यांचा यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. कारण या फोटोमध्ये त्या चक्क वृद्ध अवतारात पाहायला मिळत आहेत. आता रिअल लाइफमध्ये कायमच चिरतरुण वाटणा-या रेणुका शहाणे यांचा हा फोटो कसला आणि कधीचा असे प्रश्नही रसिकांना पडले असतील. या फोटोचं गुपित म्हणजे हा रेणुका शहाणे यांच्या आगामी सिनेमातील लूक आहे. या सिनेमाचं नाव ३ स्टोरीज असं आहे.या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लॉन्च करण्यात आलं. यांत रेणुका शहाणे या गोव्यातील वृद्ध महिलेच्या अवतारात पाहायला मिळत आहेत. आजवर रेणुका शहाणे या अशा अवतारात रुपेरी पडद्यावर दिसल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचा हा नवा लूक आणि भूमिका याविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात रेणुका यांच्यासह शरमन जोशी, रिचा चढ्ढा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.अर्जुन मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा १६ फेब्रुवारीला 2018 रसिकांच्या भेटीला येणार आहे.Also Read:प्रद्युम्नच्या हत्येचा खुलासा ऐकून रेणुका शहाणेला बसला धक्का, फेसबुकवर लिहिली पोस्ट!रेणुकाने लिहिले की, ‘आता वेळ आली आहे की, इंटरनॅशनल स्कूलला झोपेतून जागे केले जावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून योग्य शिक्षण दिले जाईल. मला अपेक्षा आहे की, कोणीतरी या श्रीमंतांना समजावूून सांगायला हवे की, पैसाच सर्व काही नाही. पैशाने चांगले संस्कार आणि आणि चांगले शिक्षण विकत घेता येत नाही.यशाचा शॉर्टकट नसतो.