Join us  

सोशल मीडियावरील ललित प्रभाकरच्या या फोटोमागे रहस्य दडलंय काय?वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 1:48 PM

सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे.

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. असं असलं तरी मराठी अभिनेता कधी ही आपला लूक चेंज करत नाही किंवा तो तसे करायला घाबरतो अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. मात्र सध्याची नव्या कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे ललित प्रभाकर. 

 

रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल आणि दाढी यामुळे ललित सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या लूकवर बरीच चर्चाही रंगली आहे. मात्र ललित प्रभाकरच्या या फोटो मागे दडलंय एक खास रहस्य. ते म्हणजे लवकरच  हिंदी रिमेक  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अर्जुन रेड्डी’ असं तेलुगू चित्रपटाचं नाव आहे, ज्याचा हिंदी रिमेक प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार विजय देवरकोंडा हा सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला असून त्याच्या लूकने कलाकारसुद्धा प्रभावित झाले आहेत. मराठी अभिनेता ललित प्रभाकर यानेसुद्धा हुबेहूब अर्जुन रेड्डीसारखा लूक केला आहे. त्याच्या या लूकमुळे ललित अर्जु रेड्डीचा जबरा फॅन असल्याचे स्पष्ट होते.

आपला फोटो शेअर करत त्याने एक समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. त्याने लिहीले आहे की,‘अर्जुन रेड्डी मराठीत करायचा का,’ त्याच्या प्रश्नार त्याच्या चाहत्यांनीही कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे. रुपेरी पडदाचे नव्हेतर ललित प्रभाकरने रंगभूमी, छोटा पडदा आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.

टॅग्स :ललित प्रभाकर