Join us  

जाणून घ्या अभिनेत्री मयुरी वाघच्या फिटनेसचे काय रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2017 9:52 AM

जिममध्ये तासनतास वर्कआऊट करण्यापेक्षा तिला झुंबा करणे खूप आवडते.रोज झुंबा क्लासची वेळ कधी होईल याची आतुरतेने वाट पाहात असते.

आपल्या सर्वांची लाडकी ‘अस्मिता’ म्हणजेच मयुरी वाघने सध्या स्वतःच्या फिटनेसकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहे आणि त्यासाठी तिने एक वेगळंच वर्कआऊट प्लॅन केले आहे. ‘शोधलं की सापडतं’अशा मताची असणारी अस्मिता म्हणजेच मयुरीने तिच्या फिटनेसचा  फंडा शोधून काढला आहे.मयुरीला डान्स करायला खूप आवडतं.त्यामुळे तिेने फिट राहण्यासाठी ‘झुंबा’ ही अनोखी रिदमीक वर्कआऊट ती करते. जिममध्ये तासनतास वर्कआऊट करण्यापेक्षा तिला  झुंबा करणे खूप आवडते.रोज झुंबा क्लासची वेळ कधी होईल याची आतुरतेने वाट पाहात असते.मयुरीने यावर्षी एका झुंबा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला असून तिचं हे वर्कआऊट ती खूप एन्जॉय करतेय. ही फिटने थेरपी फक्त तिच्यापुरतीच मर्यादित राहू नये त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही या रिदमिक वर्कआऊटची माहिती मिळावा यासाठी तिने तिच्या झुंबा डान्स मूव्हजचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयुरीने तिच्या चाहत्यांमध्येही एका अर्थाने फिटनेसविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठीा थेरपीचे महत्त्वही पटवून देत आहे.तसेच झुंबामुळे मला फिट आणि अॅक्टीव्ह राहायला मदत होते.झुंबामध्ये संगीत आणि डान्सचा समावेश असल्यामुळे कॅलरीज बर्न  होण्यासाठी 'झुंबा' हे एक उत्तम माध्यम आहे असेही मयुरीने सांगितले.एका फन वर्कआऊट मधून देखील आपण फिट आणि हेल्थी राहु शकतो हे या व्हिडीओतून मयुरीने दाखवून दिले आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे झुंबा मूव्हज नक्कीच आवडतील यात शंकाच नाही.