संस्कृती बालगुडेसाठी काय आहे महत्वाचे़?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 14:34 IST
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीसाठी काही महत्वाची गोष्ट असते. ती गोष्ट त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. ते त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार ...
संस्कृती बालगुडेसाठी काय आहे महत्वाचे़?
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीसाठी काही महत्वाची गोष्ट असते. ती गोष्ट त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. ते त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. अशीच एक गोष्ट अभिनेत्री संस्कृती बालगुडेसाठी महत्वाची असल्याचे तिने सोशलमीडियावर सांगितले आहे. नुकताच संस्कृतीने डान्सची स्टेप करतानाचा एक फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर तिने एक पोस्टदेखील अपडेट केले आहे. ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगते, माझ्यासाठी डान्स हे जीवन आहे. माज्या प्रत्येक श्वास हा डान्स आहे. त्याचबरोबर डान्स माझ्यासाठी ताकद आहे. डान्स मला एक प्रकारचा आनंद देत असल्याचेदेखील तिने सोशलमीडियावर सांगितले. तिच्या या फोटोला आणि पोस्टला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना पाहायला मिळत आहे. झक्कास, एक मराठीमधील दमदार अभिनेत्री म्हणून तिला कमेंन्टसदेखील मिळताना दिसत आहेत. तसेच मध्यंतरीदेखील अभिनेत्री अमृता खानविलकर हिने डान्स माझे पॅशन असल्याचे तिने सांगितले होते. त्याचप्रमाणे डान्ससाठी मी नेहमीच तयार असते असेदेखील तिने सांगितले होते. आता याच्यापाठोपाठ संस्कृतीनेदेखील डान्सविषयी असलेले आपले प्रेम सोशलमीडियावर व्यक्त केले आहे. संस्कृतीने मराठी चित्रपटसृष्ट्रीत अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखविली आहे. पिंजरा, जल्लोष सुवर्णयुगाचा, विवाहबंधन असे अनेका मालिका तिने केल्या आहेत. त्याचप्रमाणे सांगतो ऐका, शॉर्टकट, एक थ्रिलर नाइट असे अनेक चित्रपट तिने मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. त्याचप्रमाणे ती एफयू या आगामी चित्रपटातदेखील झळकणार आहे. हा महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आकाश ठोसर, माधव देवचक्के, सत्या मांजरेकर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.