Join us  

स्वप्निल जोशीला स्क्रीनवर पाहिल्यावर काय करते मायरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 12:30 PM

स्वप्निल जोशीच्या करियरच्या दृष्टीने गेले वर्षं खूपच महत्त्वाचे होते. त्याच्या भिकारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ...

स्वप्निल जोशीच्या करियरच्या दृष्टीने गेले वर्षं खूपच महत्त्वाचे होते. त्याच्या भिकारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. स्वप्निलच्या आयुष्यात एक वर्षांपूर्वी एक गोंडस परी असून या परीने त्याचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले आहे. त्याची मुलगी मायरा ही आता वर्षाची झाली असून तिला चांगलेच समजायला लागले आहे. ती आता तिच्या वडिलांना टिव्हीवर पाहायला देखील लागली आहे. तिने भिकारी हा चित्रपट देखील चित्रपटगृहात जाऊन पाहिला होता. या विषयी सीएनएक्सशी बोलताना स्वप्निल सांगतो, मायराला आता चांगलेच कळायला लागले आहे. मी माझ्या कामाच्या निमित्ताने अनेक वेळा घराच्या बाहेर असतो. त्यामुळे ती मला आवर्जून स्क्रीनवर पाहते. जेवताना तर ती माझी गाणी पाहाते. माझी गाणी पाहिल्याशिवाय तिला जेवण जात नाही असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पण कोणत्या गाण्यात एखादी नायिका माझ्या जवळ आली किंवा कोणत्या अभिनेत्रीने मला जवळ घेतले, मला मिठी मारली तर ती जोरारजोरात रडायला लागते. माझ्या वडिलांना कोण कसा काय हात लावू शकते असा प्रश्न तिला पडतो. अभिनेत्री माझ्या मिठीतून बाहेर पडली की, ती हसायला लागते. ही गोष्ट पाहून आम्हाला देखील खूप मजा वाटते.स्वप्निल जोशीने उत्तर रामायण या मालिकेद्वारे वयाच्या नवव्या वर्षी त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने कृष्णा या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली. प्रेक्षकांना ही भूमिका प्रचंड आवडल्याने लोकांनी ती अक्षरशः डोक्यावर घेतली होती. हद कर दी आपने, दिल विल प्यार व्यार, देस में निकला होगा चाँद, अमानत यांसारख्या मालिकांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गुलाम ए मुस्तफा या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते.स्वप्निल आज मराठीतील सुपरस्टार असून दुनियादारी, मुंबई पुणे मुंबई यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. Also Read : पाहाच स्वप्निल जोशीची लेक मायराचे हे क्यूट फोटो