Join us

विक्रम फडणीसचे दिग्दर्शनात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 17:22 IST

फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस ‘हृदयांतर’ ह्या मराठी चित्रपटाव्दारे निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग ...

फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस ‘हृदयांतर’ ह्या मराठी चित्रपटाव्दारे निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग बेरी एन्टरटेन्मेट ह्यांची निर्मिती असलेला ‘हृदयांतर’ चित्रपट एक हृदयस्पर्शी कथा आहे. ह्या चित्रपटात सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे मुख्य भुमिकेत दिसतील. एका दाम्पत्याची त्यांच्या वैवाहिक जीवनातली वादळांशी असलेली झुंज दाखवणारा हा सिनेमा आहे. गेल्या काही कालावधी पासून एका उत्तम सिनेमा बनवण्याचं स्वप्न विक्रम फडणीसने बाळगलं होतं. जे आता पूर्णत्वास येतंय. सुप्रसिध्द डिझायनर आणि दिग्दर्शक विक्रमच्या पहिल्या वहिल्या सिनेमाचा मुहूर्त मुंबईत पार पडला. या चित्रपटाचा मुहूर्त बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खानच्या हस्ते पार पडला. तसेच यावेळी अभिनेता अर्जुन कपूरही उपस्थित होता.  आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल विक्रम खूपच उत्साही दिसला.